मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ईशा देओलचं बॉलिवूडमध्ये कमबॅक; 11 वर्षानंतर करणार अजय देवगणसोबत काम

ईशा देओलचं बॉलिवूडमध्ये कमबॅक; 11 वर्षानंतर करणार अजय देवगणसोबत काम

ईशा काही काळ बॉलिवूडमध्ये फार सक्रिय होती. ‘धूम’ (Dhoom) सारख्या सुपरहिट चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण विवाहानंतर ती बॉलिवूड मधून गायब झाली.

ईशा काही काळ बॉलिवूडमध्ये फार सक्रिय होती. ‘धूम’ (Dhoom) सारख्या सुपरहिट चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण विवाहानंतर ती बॉलिवूड मधून गायब झाली.

ईशा काही काळ बॉलिवूडमध्ये फार सक्रिय होती. ‘धूम’ (Dhoom) सारख्या सुपरहिट चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण विवाहानंतर ती बॉलिवूड मधून गायब झाली.

मुंबई 7 जुलै : बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी काही काळानंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood) काम करणं बंद केलं आहे. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री ईशा देओल (Isha Deol). अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा हिने 2002 साली ‘कोई मेरे दिलसे पुछे’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

ईशा काही काळ बॉलिवूडमध्ये फार सक्रिय होती. ‘धूम’ (Dhoom) सारख्या सुपरहिट चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण विवाहानंतर ती बॉलिवूड मधून गायब झाली. पण आता ती कमबॅक करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. OTT platform वरून ती कमबॅक करणार आहे.

सायरा बानू यांना धीर देण्यासाठी पोहोचले CM आणि शरद पवार; शाहरुखनंही केलं सांत्वन; पाहा PHOTOS

‘रुद्र : द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra : The Edge Of Darkness) या सीरिजमध्ये ती दिसणार आहे. डिस्नी प्लस होटस्टारची ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

जवळपास एका दशकानंतर अभिनेत्री इशा देओल आणि अजय देवगण (Ajay Devgn) एकत्र झळकणार आहेत. तर ईशा ही अनेक वर्षानंतर पडद्यावर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच अजयने या सीरिजची घोषणा केली होती.

2015 साली एका साऊथ चित्रपटात ती दिसली होती. त्यानंतर एका शॉर्ट फिल्म मध्ये. पण बॉलिवूड मध्ये गेली अनेक वर्षे ती दिसली नव्हती. त्यामुळे ईशाच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच  गुड न्यूज आहे.

2012 साली तिने भारत तख्तानी याच्याशी विवाह केला होता. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. तिला 2 मुलंही आहेत. त्यामुळे तिने कुटुंबासोबतच जास्तीत जास्त वेळ घालवणं पसंत केलं होतं. तर आता ती कमबॅक करत आहे.

First published:
top videos

    Tags: Ajay devgan, Bollywood actress, Entertainment