मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'कपडे घातले नाहीस का?'; Ileana D'Cruz च्या बेडरूम सेल्फीवर खिळल्या सर्वांच्या नजरा

'कपडे घातले नाहीस का?'; Ileana D'Cruz च्या बेडरूम सेल्फीवर खिळल्या सर्वांच्या नजरा

इलियाना डिक्रुजचा (Ileana D’Cruz)  हा फोटो खूप चर्चेत आहे.

इलियाना डिक्रुजचा (Ileana D’Cruz) हा फोटो खूप चर्चेत आहे.

इलियाना डिक्रुजचा (Ileana D’Cruz) हा फोटो खूप चर्चेत आहे.

मुंबई, 28 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुज (Ileana D’Cruz) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो इन्स्टाग्रामवर (Ileana D’Cruz On Instagram) शेअर करत असते. यावेळी देखील इलियानाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एका बेडरूम सेल्फी पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर तिचा हा फोटो खूप चर्चेत आहे. यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

इलियानाने तिचा लेटेस्ट सेल्फी (Ileana D’Cruz selfie) सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यात ती बेडवर झोपलेली दिसत आहे (Ileana D’Cruz bedroom photo). सेल्फी शेअर करताना इलियानाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'स्वतःवर प्रेम करण्याचा दिवस. स्वतःशी दयाळू व्हा, स्वतःला मिठीत घ्या आणि आज फक्त स्वतःची स्वतः गळाभेट घ्या आणि ज्या ज्या अद्भुत गोष्टींचा आनंद घेऊ शकता त्याचा भरपूर आनंद घ्या' (Ileana D’Cruz topless photo)

या फोटोत इलियानाने टॉप किंवा शर्ट घातलेला दिसत नाही. या फोटोला पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत आणि दोन हजारांहून अधिक लोकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. अभिनेत्रीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी तर कमेंटचा पाऊस पाडला आहे असंच म्हणावं लागेल. एका नेटकऱ्यांने म्हटले आहे की, 'तू कपडे घातले नाहीस का?' तर दुसऱ्या नेटकऱ्याने, 'प्लीझ फक्त अंगावर घेतलेली चादर बाजूला कर', अशी कमेंट केली आहे.

हे वाचा -  'दबंग गर्ल'चा ग्लॅमरस अंदाज; पाहा सोनाक्षी सिन्हाचं नवं PHOTOSHOOT

इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच इलियाना डिक्रूझचा 'द बिग बुल' हा चित्रपटात दिसली होती.  इलियानाने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इलियानाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका तेलगू चित्रपटातून केली. यानंतर तिने देवदासू, केडी, खतरनाक अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा आगामी चित्रपट तेरा क्या होगा लवली आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा देखील आहे.

हे वाचा - 'तुला साष्टांग दंडवत', राज कुंद्रावरून ट्रोल करणाऱ्या शर्लिन चोप्राने आता शिल्पा शेट्टीसमोर जोडले हात

इलियाना चित्रपटांसह तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. यापूर्वी तिने बिकिनीमध्ये एक फोटो शेअर केला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता. यामध्ये इलियाना मल्टी कलर बिकिनीमध्ये सनबाथ घेताना दिसली होती.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment