मुंबई, 12 मे- बॉलिवूड
(Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी
(Shilpa Shetty) आपल्या स्टाईल आणि फिटनेसमुळे प्रचंड चर्चेत असते. शिल्पा आपल्या फिटनेस आणि सौंदर्याच्या जोरावर नवख्या अभिनेत्रींना बरोबरीची टक्कर देते. ती सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. दररोज ती आपल्या फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तुम्हीही शिल्पाला सोशल मीडियावर फॉलो करत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच चकित करेल. कारण शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाचा निरोप घेतला आहे
(Shilpa Shetty break from social media).अभिनेत्रीने स्वतः एक ब्लँक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
शिल्पा शेट्टीचा मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीला अनेक लोक फिटनेस आणि स्टाईल आयकॉन म्हणून पाहतात. कित्येकांना शिल्पा शेट्टीसारखी फिगर आणि सौंदर्य कमावण्याची ईच्छा आहे. तसेच शिल्पा शेट्टीसुद्धा तिच्या पोस्टद्वारे लोकांना फिटनेस आणि आरोग्य इत्यादीसाठी लोकांना मार्गदर्शन करत असते. पण आज शिल्पाने चाहत्यांची निराशा केली आहे. कारण अभिनेत्रीने नुकतंच पोस्ट शेअर करत सांगितलं की, तिने इन्स्टाग्राम आणि ट्विटर या दोन्हींमधून ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला आहे.ही पोस्ट समोर येताच अभिनेत्रींचे चाहते निराश होऊन कमेंट्स करत आहेत.
शिल्पा शेट्टी पोस्ट-
शिल्पा शेट्टीने एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावरून का ब्रेक घेत आहे याचं कारण सांगितलं आहे. शिल्पाने लिहिलंय,- 'फक्त एकच-एक गोष्टीचा कंटाळा आला आहे. सर्व काही सारखे दिसत आहे... जोपर्यंत मला नवीन कोणता अवतार मिळत नाही तोपर्यंत सोशल मीडियापासून दूर जात आहे.'अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. शिवाय सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिल्पाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीचे ट्विटरवर 6.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर 25.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.
गेल्या वर्षी शिल्पाचा पती राज कुंद्रानेही सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. जामिनावर सुटल्यानंतर त्याने सोशल मीडियाचा निरोप घेत आपले सर्व सोशल मीडिया हँडल निष्क्रिय केले होते. पण काही काळानंतर खाजगी प्रोफाइलसह इन्स्टाग्रामवर पुनरागमन केलं होतं.राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी प्रचंड चर्चेत होती. तिलासुद्धा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.