• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अभिनेत्री एवलिन शर्मानं लेकीला दिला जन्म; सुंदर PHOTO शेअर करत सांगितलं 'नाव'

अभिनेत्री एवलिन शर्मानं लेकीला दिला जन्म; सुंदर PHOTO शेअर करत सांगितलं 'नाव'

अभिनेत्री आणि मॉडेल एव्हलिन शर्मा (Evelyn Sharma) आणि तिचा पती तुषान भिंडी (Tushaan Bhindi) आता आई-बाबा बनले आहेत. एव्हलिन शर्माने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दरम्यान अभिनेत्रीने आज सोशल मीडियावर आपल्या मुलीची ओळख करून दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर- अभिनेत्री आणि मॉडेल एव्हलिन शर्मा  (Evelyn Sharma)  आणि तिचा पती तुषान भिंडी  (Tushaan Bhindi) आता आई-बाबा बनले आहेत. एव्हलिन शर्माने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दरम्यान अभिनेत्रीने आज सोशल मीडियावर आपल्या मुलीची ओळख करून दिली आहे. सोशल मीडियावर पहिली झलक दाखवत अभिनेत्रीने सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव 'अवा'  (Ava Bhindi)  ठेवले आहे. लाडक्या मुलीसोबतचा फोटो शेअर करत एव्हलिन शर्माने लिहिले, 'माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची भूमिका.. अवा भिंडीची आई.' यासोबतच अभिनेत्रीने अवा भिंडीचे नवे इंस्टाग्राम अकाउंटही सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबरला एव्हलिनने बाळाला जन्म दिला आहे. त्यांच्या मुलीच्या जन्माआधी एव्हलिन आणि तुषान यांनी एक सुंदर रोपवाटिकाही बांधली होती.एव्हलिन शर्माने अलीकडेच बॉम्बे टाईम्सशी बोलताना सांगितले की, 'आम्ही खूप उत्साही आहोत आणि आमच्या लहान मुलाला आमच्या हातात घेण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. ती मुलगी आहे आणि आम्ही खूप उत्सुक आहोत. आमच्याकडे लहान राजकुमारीसाठी एक आरामदायक नर्सरीसुद्धा तयार केली आहे. पण मला माहीत आहे की पहिले काही महिने ती आमच्यासोबत आमच्या पलंगावर झोपेल. कुटुंब आणि मित्रांकडून मिळालेल्या भेटवस्तूंबद्दल आम्ही खूप आभारी आहोत…आणि आम्ही लवकरच आपली बेबी भिंडीशी ओळख करून देणार आहोत. एव्हलिन शर्माने जुलैमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्विमसूटमधील तिचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये तिचा उत्साह व्यक्त केला होता. अभिनेत्रीने एक स्विम सूटवरील आराम करतानाचा फोटो शेअर केला होता. ज्यात तिने आपल्या पोटावर हात ठेवलं होतं. यासोबतच तिने तुला आपल्या कुशीत घेण्यासाठी आणखी प्रतीक्षा होत असल्याचं म्हणत आपला आनंद व्यक्त केला होता. याशिवाय एव्हलिनने नुकताच सोशल मीडियावर तिचा बेबी बंप दाखवणारा एक फोटो शेअर केला होता. अभिनेत्री एव्हलिन शर्मा गेल्या 9 वर्षांपासून मनोरंजन क्षेत्राचा एक भाग आहे. एव्हलिनने मैं तेरा हीरो, साहो, जब हॅरी मेट सेजल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला लोकप्रियता 'ये जवानी है दिवानी' मधून मिळाली होती. या चित्रपटात ती रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणसोबत झळकली होती. यामध्ये ती एका हॉट परंतु मजेशीर भूमिकेत होती.
  Published by:Aiman Desai
  First published: