मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दिशा पाटनीनं रात्रीच सेलिब्रेट केला टायगर श्रॉफचा बर्थडे; PHOTO झाले व्हायरल

दिशा पाटनीनं रात्रीच सेलिब्रेट केला टायगर श्रॉफचा बर्थडे; PHOTO झाले व्हायरल

अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कुटुंबासोबत दिशा पटानीदेखील (disha patani) दिसून आली.

अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कुटुंबासोबत दिशा पटानीदेखील (disha patani) दिसून आली.

अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कुटुंबासोबत दिशा पटानीदेखील (disha patani) दिसून आली.

मुंबई, 02 मार्च :  आपल्या पिळदार शरीरयष्टीने तरुण-तरुणींना आकर्षित करणारा अभिनेता टायगर श्रॉफचा आज 31 वा वाढदिवस (Tiger Shroff Birthday) आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध आले आहेत. तरीही अशा स्पेशल दिवशी काही ना काही वेगळं केलं जातंच आणि त्यातही ती व्यक्ती सेलेब्रिटी असेल तर ती शक्यता अधिकच. टायगर श्रॉफ त्याची चर्चित गर्लफ्रेंड दिशा पटानी (Disha Patani) हिच्यासोबत बांद्र्यातल्या एका रेस्तराँबाहेर दिसला. ते दोघंही कॅमेऱ्यात कैद झाले. टायगरची आई आयेशा श्रॉफ (Ayesha Shroff) आणि बहीण कृष्णा श्रॉफही (Krishna Shroff) होती. साहजिकच या स्टार कुटुंबाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

28 वर्षांची अभिनेत्री दिशा पटानी तिच्या स्टाइलसाठी कायम चर्चेत असते. टायगरच्या बर्थडे पार्टीवेळी ती स्लिव्हलेस टॉप आणि हाय वेस्ट डार्क पँट अशा वेशात होती.  टायगर श्रॉफ नेहमीप्रमाणेच ग्रे टी-शर्ट आणि डेनिम अशा वेशात होता. दोघांनीही आवर्जून मास्कही घातले होते, असं फोटोमध्ये दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

दिशा आणि टायगर हे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असल्याचं बोललं जात असलं, तरी त्या दोघांनीही अद्याप आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. अर्थात, तरीही त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो बरंच काही सांगून जातात.

हे वाचा - 'सुशांत गेला यात माझी काय चूक?', VIDEO तून अंकिताचं ट्रोलर्सना सणसणीत उत्तर

अनेकदा ते दोघं डेटवर किंवा सुट्टीसाठी फिरायला एकत्र गेलेले दिसतात. अगदी गेल्याच आठवड्यात मुंबईतल्या एका मैदानावरही दोघं एकत्र दिसले होते. टायगर तिथे फुटबॉल खेळत होता आणि दिशा त्याचा खेळ पाहत होती. अशा अनेक ठिकाणी ते दोघंही एकत्र असल्याने त्यांनी काही सांगायच्या आधीच लोक अर्थ लावून मोकळे झाले आहेत. त्यातच टायगरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला आई आणि बहिणीसोबत दिशाही उपस्थित होती, म्हणजे त्यांच्या कुटुंबात तिला किती जवळचं स्थान आहे, हेही यावरून दिसतं.

दिशाच्या हातात सध्या अनेक फिल्म्स आहेत. अलीकडेच 'एक व्हिलन - टू' या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात झाली. त्यात दिशा जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. मोहित सुरीने दिग्दर्शित केलेल्या 'एक व्हिलन' या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या या चित्रपटात अर्जुन कपूर आणि तारा सुतारियादेखील आहेत. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर दिशाने या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतल्याचं बोललं जात आहे.

हे वाचा - स्टार किड असूनही एकेकाळी जमिनीवर झोपायची आली वेळ, मेहनतीच्या जोरावर कमावलं नाव

'राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई' हा सलमान खानची (Salman Khan) मुख्य भूमिका असलेला चित्रपटही दिशाच्या हातात आहे. भारत या चित्रपटात ती सलमानसोबत अगदी छोट्या भूमिकेत दिसली होती; पण ती भूमिका लोकांच्या लक्षात राहिली होती. 'स्लो मोशन' या गाण्यातली त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. आता ते दोघं 'राधे'मध्ये पुन्हा एकत्र दिसतील. टायगरच्या हातात सध्या 'गणपत' आणि 'बाघी 4' हे सिनेमे आहेत. गणपतमध्ये त्याच्यासोबत त्याची डेब्यू हिरॉइन क्रिती सॅनॉन झळकणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Disha patani, Tiger Shroff