दसऱ्यानिमित्त अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)ने ट्विटरवरुन दिलेल्या दिलेल्या शुभेच्छा पाहून चर्चांना उधाण आलं आहे. भगवा रंग आणि धनुष्य बाण पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई, 25 ऑक्टोबर: दसऱ्यानिमित्त प्रत्येक सर्वांनीच एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यंदा कोरोनामुळे प्रत्यक्ष घरी जाऊन शुभेच्छा देता आल्या नाही तरी सोशल मीडियावर सर्वांनींच एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यात बॉलिवूडचे कलाकारही मागे नव्हते. प्रत्येकाने सोशल मीडियावर चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha patani)ने ट्विटरवरुन शेअर केलेला फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. दिशाने दसऱ्यानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरुन दिशाने एका धनुष्यबाणाचा फोटो शेअर केला आहे. आणि हॅपी दसरा असं म्हटलं आहे.
भगव्या रंगातल्या धनुष्यबाणाचा आणि शिवसेनेचा खास संबंध आहे. तसाच संबंध दिशा पटानी आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचादेखील आहे. दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांच्या 'मैत्री'च्या चर्चा आपण अनेकदा ऐकल्या आहेत. तसंच अनकेदा एकमेकांना भेटले असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अहमदनगरमधील आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे दिशा पटानीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तर दिलं. जेव्हा आदित्य ठाकरेंची मंत्रिमंडळात नियुक्ती झाली होती तेव्हा दिशाने आदित्य ठाकरेंचं कौतुकही केलं होतं. "महाराष्ट्राला एका तरुण नेत्याची गरज होती आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. आणि त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक तरुण, तडफदार नेतृत्व मिळालं आहे" असं दिशाने म्हटलं होतं.
दसऱ्यानिमित्त दिशाने केलेलं ट्वीट बरंच काही सांगून जात आहे. दिशाने ट्वीटमधून भगव्या रंगाचा धनुष्यबाण दाखवत दसऱ्याच्या शुभेच्छा देणं म्हणजे निव्वळ योगायोग आहे की, त्यामागे काही खास कारण आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.