मुंबई, 9 नोव्हेंबर- बॉलिवूडमधल्या सध्याच्या ॲक्ट्रेस बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल आहेत असं म्हटलं जातं. त्या फक्त शोभेच्या बाहुल्या नाहीत हे अनेकदा सिध्दही झालं आहे. आपल्या कामानं, अभिनयानं तर त्यांनी छाप पाडली आहेच पण ॲक्शनमध्येही त्या कुणापेक्षाही कमी नाहीत. आपला फिटनेस आणि सौंदर्य यांचा मिलाफ साधणाऱ्या या अभिनेत्रींमध्ये सध्या दिशा पाटनीची (Disha Patani) जोरदार चर्चा आहे. दिशा तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखली जाते. सौंदर्य, अभिनय आणि फिटनेसच्या जोरावर दिशानं इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिचे सोशल मीडियावरील फोटो अनेकदा तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतात. आताही तिनं एक व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहून तिचे चाहते आणखीनच तिच्या प्रेमात पडले आहेत.
दिशानं मार्शल आर्टचं (Marshal Art) प्रशिक्षण घेतलं आहे. त्यामुळे असे चॅलेंजेस ती नेहमी स्वीकारते आणि ती पूर्णही करते. आता दिशानं 720 डिग्री किक (720 Degree Kick) मारण्याचं चॅलेंज पूर्ण केलं आहे. त्यानंतर तिनं हा व्हिडिओ सोशल मी़डियावर शेअर केला आहे. हे चॅलेंज अर्थातच अजिबात सोपं नव्हतं.हा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये बनवण्यात आला आहे. त्यात दिशा रेड बॉक्स पँट आणि ब्लॅक टी शर्ट घालून किकरमध्ये फ्लिप करत जोरदार किक मारताना दिसत आहे.
वाचा : सलील कुलकर्णी यांनी घेतला मोठा निर्णय ; ज्येष्ठांसाठी करणार हे काम
हा अवघड स्टंट आहे पण दिशानं तो साध्य केला आहे. त्यामुळे अर्थातच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी तिचं जोरदार कौतुक करतच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. ‘आग लावली आहेस’, असं एका फॅननं लिहीलं आहे. तर ‘हळूहळू टायगर श्रॉफची (Tiger Shroff) लक्षणं दिसत आहेत’ अशी प्रतिक्रिया आणखी एका फॅननं दिली आहे. तर आणखी एका फॅननं ‘माशाल्लाह’ अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
दिशाचा जवळचा मित्र टायगर श्रॉफ मार्शल आर्टचा तज्ज्ञ आहे. त्याला ॲक्शन फायटिंगमधील बाप मानलं जातं. ‘अखेर तू करून दाखवलंस. खूप छान..’अशी प्रतिक्रिया टायगरनं दिशाच्या या व्हिडिओवर दिली आहे दिली आहे. दिशासोबतच त्यानं दिशाचे ट्रेनर राकेश यादव यांचाही उल्लेख केला आहे.राकेश यादव (Rakesh Yaddav) सेलिब्रिटीजना मार्शल आर्टचं प्रशिक्षण देतात. गेल्या अनेक दिवसांपासून टायगर आणि दिशाच्या अफेअरबद्दल चर्चा सुरु आहेत. पण दोघांनीही आतापर्यंत याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही. हे दोघेजण अनेकदा एकत्र फिरतानाही दिसले आहेत.पण आपल्या नात्याबदंदल मात्र दोघएही अजून मौन बाळगून आहेत.
वाचा : ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अभिनेत्याच्या कारला भीषण अपघात
दिशाच्या फिटनेसबद्दल बोलायचं तर ती स्वत:ला नेहमीच फिट ठेवते. वर्कआऊटमधलं सातत्य आणि डाएटही ती व्यवस्थित फॉलो करते. वर्कआऊटचे अनेक व्हिडिओ ती नेहमीच आपल्या फॅन्सबरोबर शेअर करत असते. यापूर्वी दिशानं 80 किलो वजन उचलतानाचा तिचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना देखील खूप आवडला होता. दिशा नृत्यातही पारंगत आहे. यापूर्वी तिच्या मलंग सिनेमातील अभिनयाचं भरपूर कौतुक झालं होतं. सलमानच्या ‘राधे: युअर मोस्ट वाँटेड भाई’ या सिनेमातही ती दिसली होती. तर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या सिनेमाचं शेड्युल पूर्ण झाल्याचंही तिनं नुकतंच सांगितलं. या सिनेमात दिशा जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारियासोबत दिसणार आहे.
फिटनेस आणि सौंदर्य यांच्या जोरावर दिशा पटानी सध्या तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. तिच्या या किकच्या व्हीडिओनंतर आता ती पुढचं कोणतं फिटनेस चॅलेंज स्वीकारणार आणि ते कसं पूर्ण करणार याबद्दल तिच्या फॅन्सना उत्सुकता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Disha patani