S M L

आता या मराठमोळ्या अभिनेत्रीनंही केला आलोकनाथवर आरोप

दीपिका देशपांडे या टीव्ही अभिनेत्रीनं आता आलोकनाथवर आरोप केले आहेत. दीपिका यांनी फॅन, रांझणा, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटांमधून चरित्र नायिका म्हणून भूमिका केल्या आहेत.

Updated On: Oct 11, 2018 08:01 PM IST

आता या मराठमोळ्या अभिनेत्रीनंही केला आलोकनाथवर आरोप

मुंबई, ११ ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका देशपांडेंनी आलोकनाथ बद्दलचा अनुभव शेअर केला आहे. लेखक, दिग्दर्शक विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर टीव्ही सिरियल आणि चित्रपटातील अभिनेत्री दीपिका देशपांडे यांनी आलोकनाथ यांच्यावर तोफ डागली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'सोनू के टिटो की स्विटी' या चित्रपटातून दीपिका यांनी आलोकनाथ यांच्याबरोबर काम केलं होतं. या चित्रपटाच्या  शूटिंगदरम्यान आलोकनाथांची वर्तणूक चांगली नव्हती, असं दीपिकानी ट्विटरच्या माध्यमातून लिहिलंय.

दीपिका यांच्या म्हणण्यानुसार संध्याकाळच्या वेळेनंतर आलोकनाथ यांच्या वागण्या-बोलण्यात फरक होतो. एकत्र काम करताना आलोकनाथ यांनी दीपिका यांच्यासोबत गैरवर्तणूक करत त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे युनिटमधल्या इतर माणसांनी दीपिकाच्या भोवती कडं केल्यामुळे आपण वाचल्याचं दीपिका यांचं म्हणणं आहे. इंडस्ट्रीतील सर्व लोकांना माहीत आहे आलोकनाथ यांना दारूचं किती व्यसन आहे, असंही दीपिका यांनी लिहिलंय.

सेल्स एक्झिक्युटिव्ह ते 'पेज 3', आलोकनाथवर आरोप करणारी संध्या मृदुल आहे कोण?


दिपिका यांच्या मते, काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजनच्या  शूटसाठी बाहेर असताना आलोकनाथ माझ्या रूममध्ये आले आणि त्यांनी गैरसमज निर्माण करत चुकीची वर्तवणूक केली. परंतु युनिट सोबत असल्याने आणखी छळ होण्यापासून वाचले. विनता नंदा यांची पोस्ट शेअर करत दीपिका देशपांडे यांनी आलोकनाथ यांच्याबद्दलचा अनुभव ट्विट करून शेअर केलाय.

कोण आहेत दीपिका देशपांडे?

दीपिका देशपांडे या टेलिव्हीजन सिरीयलमध्ये काम करतात. त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये नायक/नायिकांची आई म्हणून भूमिका बजावताना दिसतात. फॅन चित्रपटात शाहरूख खानचा डुप्लिकेट असलेला गौरव या व्यक्तिरेखेच्या आईची भूमिका त्यांनी स्वीकारली होती. तसेच हम्प्टी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात आलियाची आई आणि रांझणा सिनेमात सोनम कपूरची आई म्हणून त्यांनी काम केलं आहे.

दीपिका देशपांडे यांनी केलेल्या आरोपाबाबात आलोकनाथ यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. आलोकनाथ यांचे स्पष्टीकरण येताच बातमी अपडेट करण्यात येईल.

 

VIDEO - बिग बॉसमध्ये जसलीनने अनुप जलोटांभोवती केला पोल डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 08:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close