Home /News /entertainment /

अन् दीपिकाचा राग अनावर; रोहित शेट्टीच्या डोक्यात फोडली काचेची बाटली: VIDEO

अन् दीपिकाचा राग अनावर; रोहित शेट्टीच्या डोक्यात फोडली काचेची बाटली: VIDEO

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) चा एक व्हिडीओ सध्या फारच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सेटवर बसलेल्या रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) डोक्यात दीपिका कोल्ड्रिंकची बाटली फोडत आहे असं दिसत आहे.

  मुंबई, 24 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone)च्या आयुष्यात गेले काही दिवसांपूर्वी एनसीबी चौकशीचं वादळ आलं होतं. पण त्या सगळ्यातून सावरत दीपिका कामाला लागली आहे. दरम्यान दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका पादुकोन आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) एका सेटवर शूटिंगसाठी बसलेले दिसत आहेत. दीपिका काहीतरी खात आहे. आणि कोल्ड्रिंक पीत आहे असं दिसत आहे. रोहित तिला खाताना सारखं अडवत आहे. आणि अचानक दीपिकाला राग येतो आणि ती कोल्ड्रिंकची बाटली रोहित शेट्टीच्या डोक्यात फोडते असं दाखवण्यात आलं आहे. चेन्नई एक्स्प्रेसच्या सेटवरील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दीपिकाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
  रोहितच्या डोक्याला खरोखर लागलेलं नसतं. दीपिकाने बाटली फोडल्यानंतर रोहित शेट्टीच्या डोक्याला दुखापत झाल्याचं दाखवण्यासाठी त्याच्या कपाळाला टॉमेटो सॉस लावलेला दिसत आहे. हा प्रँक व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. दीपिका सध्या तिच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पठाण (Pathan) सिनेमातही ती आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) झळकणार आहेत. या चित्रपटामध्ये जॉन अब्राहमही झळकणार आहे. सध्या शाहरुख या सिनेमाचं शूटिंग करत आहे. दीपिका आणि जॉनही लवकरच पठाण सिनेमाचं शूटिंग सुरू करणार आहेत.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Deepika padukone, Rohit Shetty

  पुढील बातम्या