'त्याला रंगेहाथ पकडलं अन् माफही केलं', 'त्या' रिलेशनशीपबाबत पहिल्यांदा बोलली दीपिका

'त्याला रंगेहाथ पकडलं अन् माफही केलं', 'त्या' रिलेशनशीपबाबत पहिल्यांदा बोलली दीपिका

अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाआधीच्या प्रेमाबाबत भाष्य केलं. नात्यामध्ये झालेल्या फसवणूकीवर ती उघडपणे बोलली.

  • Share this:

नवी दिल्ली: अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांची जोडी अनेकांच्या पसंतीची जोडी आहे. मात्र दोघांचीही नाव लग्नाआधी अनेकांबरोबर जोडली गेली होती. दीपिकाचं रणबीर कपूरबरोबरचं (Ranbir Kapoor) अफेअर विशेष गाजलं होतं. मात्र आता दीपवीर त्यांच्या नात्यामध्ये खूश असल्याचं पाहायाला मिळते. ते दोघेही त्यांचं प्रेम खुलेआम व्यक्त करत असतात.

दरम्यान अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाआधीच्या प्रेमाबाबत भाष्य केलं. नात्यामध्ये झालेल्या फसवणूकीवर ती उघडपणे बोलली. दीपिका पदुकोण या मुलाखतीत म्हणाली की, "माझ्यासाठी सेक्स म्हणजे केवळ शारीरिक जवळीक नसून त्यात भावना देखील आहेत. मी कुणाला कधी फसवले नाही किंवा काहीही लपवले नाही, जर कुणी माझ्यसोबत फसवणूक केली तर मी त्या नात्यामध्ये का असावे. त्यापेक्षा चांगले आहे की मी सिंगल राहीन’

(हे वाचा- ‘...तर कंगना अभिनय करणं सोडून देईल’ रंगोली चंडेलचं बॉलिवूडकरांना ओपन चॅलेंज)

दीपिकाने या मुलाखतीमध्ये कुणाचं नाव घेतलं नाही, मात्र तिला घटनेमुळे खूप दु:ख झाल्याचं दिसून आलं. ती पुढे म्हणाली की, "मी इतकी मूर्ख होते की मी त्याला रंगेहाथ पकडूनही दुसरी संधी दिली. त्याने माझ्याकडे भीक मागितली आणि माझ्याकडे विनवणी केली. मी इतकी वेडी होते, की त्याला मी माफही केलं. या सर्व गोष्टींमधून बाहेर यायला मला खूप वेळ गेला.’ या मुलाखतीदरम्यान दीपिकाने तिच्या नातेसंबधांविषयी अनेक रहस्यांचा उलगडा केला

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

(हे वाचा-‘5 मुलांना डेट करणं हा तिचा स्वतःचा निर्णय’, बिनधास्त वक्तव्यामुळे फसली नेहा)

नुकताच अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा चित्रपट आला होता, ज्यामध्ये तिने अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणीची भूमिका साकारली होती. दीपिकाला या चित्रपटाकडून मोठ्या आशा होत्या पण काही राजकीय कारणांमुळे तिचा चित्रपट बर्‍याच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

(हे वाचा-स्विमिंग सूटमधील दीपिकाचे फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘सर्वात HOT फोटोशूट...’)

दीपिका लवकरच माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारित '83'  या सिनेमामध्ये नवरा रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपची कथा लवकरचं ‘83’च्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First published: March 13, 2020, 8:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading