Home /News /entertainment /

Athiya Shetty-KL Rahul बनणार आलिया-रणबीरचे शेजारी, पाली हिलमध्ये मिळालं नवं घर

Athiya Shetty-KL Rahul बनणार आलिया-रणबीरचे शेजारी, पाली हिलमध्ये मिळालं नवं घर

मनोरंजनसृष्टीत सध्या लग्न समारंभांची रेलचेल सुरु आहे. एकापाठोपाठ एक टीव्ही आणि सिने कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नानंतर, आता केएल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 एप्रिल-  मनोरंजनसृष्टीत सध्या लग्न समारंभांची रेलचेल सुरु आहे. एकापाठोपाठ एक टीव्ही आणि सिने कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नानंतर, आता केएल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे सेलिब्रेटी कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हे दोघे जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.या दोघांच्या लग्नाच्या चर्चे दरम्यान या दोघांनी नुकतंच घर खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या नव्या घराचा शोध घेत होते. या नव्या घरात हे दोघे सेलिब्रेटी कपल एकत्र राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी आम्ही तुम्हाला माहिती दिली होती की, हे दोघे सध्यातरी एका भाड्याच्या आलिशान घरामध्ये राहणार आहेत. तसेच मुंबईतील बांद्रा येथील कार्टर रोडवर हे आलिशान 4 बीएचके अपार्टमेंट आहे. दरम्यान आता नवीन रिपोर्टनुसार, अथिया आणि राहुलने मुंबईतील पाली हिल याठिकाणी एका आलिशान अपार्टमेंटमध्ये नवव्या मजल्यावर रॉयल हाऊस खरेदी केलं आहे. हे घर नवदाम्पत्य असणाऱ्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या 'वास्तू' अपार्टमेंटच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे आता हे दोघे आलिया रणबीरचे शेजारी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या रिपोर्टनुसार, अथिया आणि राहुल यांच्या या नव्या घराचं इंटिरियर डिझायनिंग सुनील शेट्टीची पत्नी म्हणजेच अथियाची आई माना शेट्टी करणार असल्याचं सांगितलं जात आहे. गौरी खानप्रमाणेच माना यासुद्धा एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहेत. त्यामुळे ते आपल्या लेकी आणि होणाऱ्या जावयाचं घर आपल्या हाताने सजवणार असल्याचं म्हटलं जात आहे.सुनील शेट्टी यांची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुमारे वर्षभरापूर्वीच त्यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा केला होता. केएल राहुल गेल्या वर्षी शेट्टी कुटुंबासोबत अहान शेट्टीचा डेब्यू चित्रपट 'तडप'च्या स्क्रीनिंगला पोहोचला होता.यावेळी त्याने संपूर्ण शेट्टी कुटुंबासोबत कॅमेऱ्याला पोज दिल्या होत्या.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Kl rahul

    पुढील बातम्या