मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अनुष्का शर्मा प्रेग्नन्सीमधील कपड्यांची करणार विक्री; वाचा काय आहे कारण

अनुष्का शर्मा प्रेग्नन्सीमधील कपड्यांची करणार विक्री; वाचा काय आहे कारण

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दाम्पत्याला जानेवारी 2021 मध्ये मुलगी झाली. तिचं नाव वामिका (Vamika) असं ठेवण्यात आलं आहे.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दाम्पत्याला जानेवारी 2021 मध्ये मुलगी झाली. तिचं नाव वामिका (Vamika) असं ठेवण्यात आलं आहे.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दाम्पत्याला जानेवारी 2021 मध्ये मुलगी झाली. तिचं नाव वामिका (Vamika) असं ठेवण्यात आलं आहे.

  मुंबई, 29 जून-  पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असायचं, तसंच भावंडंही बरीच असायची. त्यामुळे मोठ्या भावंडांचे कपडे, पुस्तकं किंवा अन्य उपयुक्त साहित्य लहान भावंडांना वापरता यावं, म्हणून जपून ठेवलं जायचं आणि लहान भावंडं ते वापरायचीही. त्या काळी सर्वसाधारण कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हा उपाय करण्यावाचून दुसरा पर्यायही नसायचा. आताच्या आधुनिक काळात यालाच सर्क्युलर फॅशन असं म्हणतात. पर्यावरण संरक्षणाची (Environment) जोड देऊन हा विषय व्यावसायिक पद्धतीने पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रसिद्ध अभिनेत्री (Actress)  अनुष्का शर्माने (Anushka Sharma) या दिशेने पाऊल टाकलं आहे. तिने गर्भारपणात वापरलेले कपडे (Clothes used during pregnancy) एका वेबसाइटद्वारे विक्रीला ठेवण्यात आले असून, त्याच्या विक्रीतून उभा राहणारा निधी सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे.

  अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दाम्पत्याला जानेवारी 2021 मध्ये मुलगी झाली. तिचं नाव वामिका (Vamika) असं ठेवण्यात आलं आहे. गर्भारपणात असताना वापरलेले कपडे काही महिन्यांसाठीच वापरले जातात. पुन्हा ते वापरण्याची वेळ सध्याच्या काळात क्वचितच येते. म्हणूनच ते कपडे सर्क्युलर फॅशन (Circular Fashion) या कल्पनेअंतर्गत विकून दुसऱ्या कोणाला तरी वापरायला द्यायचे, अशी संकल्पना मांडण्यात येत आहे.

  (हे वाचा: 'ही'अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; स्वतःचं चाहत्यांना दिली गुडन्यूज )

  वर्तनात केलेल्या छोट्या छोट्या बदलांमधून आपण समाजावर, पर्यावरणावर चांगले परिणाम घडवून आणू शकतो, असं अनुष्का शर्मा म्हणाली. 'माझ्या गर्भारपणात मला जाणीव झाली, की सर्क्युलर फॅशन इकॉनॉमीमध्ये सहभागी होण्यासाठी ही योग्य वेळ आहे. गर्भारपणातले कपडे फक्त काही महिन्यांसाठीच वापरले जातात. ते तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाबद्दल मी माहिती घेतली. त्यातून माझ्या लक्षात आलं, की हे कपडे शेअर केले गेले, तर एक चांगली यंत्रणा उभी राहू शकते. हे कपडे एकमेकांना विकले जाऊ शकतात,' असं ती म्हणाली.

  (हे वाचा: अभिनयासाठी या कलाकारांनी सोडलं होतं शिक्षण; शाहरुख खान ते प्रियंका चोप्रा पाहा.. )

  'भारतातल्या शहरी भागातल्या अगदी एक टक्का गर्भवती महिलांनीही नव्या कपड्यांऐवजी वापरलेले कपडे विकत घेतले, तरीही एका माणसाला 200 वर्षांत प्यायला जेवढं पाणी लागेल, तेवढं पाणी दर वर्षी वाचवलं जाऊ शकतं. शेअरिंग या कल्पनेवर माझा दृढ विश्वास आहे. म्हणूनच आता माझ्या गर्भारपणातले कपडे आता कोण घेतंय, हे पाहण्याची मला उत्सुकता आहे,' असं अनुष्का शर्माने सांगितलं.

  अनुष्काचे हे कपडे Dolce Vee या सोशल एंटरप्राइजच्या (Social Enterprise) वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्या कपड्यांच्या विक्रीतून आलेली रक्कम 'स्नेहा' (SNEHA) प्रकल्पांतर्गत माता आरोग्यासाठी वापरली जाणार आहे.  या http://SaltScout.com/DolceVee/AnushkaSharma लिंकवरून कपडे खरेदी करता येतील.

  अनुष्का शर्मा 2007 मध्ये फॅशन क्षेत्रात (Fashion) आली होती. त्या वेळी तिने Nush या नावाने कपड्यांची एक सीरिज सादर केली होती.

  First published:
  top videos

   Tags: Actress, Anushka sharma, Bollywood, Bollywood actress, Entertainment