मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

...आणि लेक वामिकाला अनुष्का शर्माने आपल्या छातीशी घट्ट धरलं; पाहा मुंबई एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

...आणि लेक वामिकाला अनुष्का शर्माने आपल्या छातीशी घट्ट धरलं; पाहा मुंबई एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

फोटो सौजन्य - व्हिडीओ ग्रॅब./manav.manglani/Instagram

फोटो सौजन्य - व्हिडीओ ग्रॅब./manav.manglani/Instagram

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma), क्रिकेटर विराट कोहलीचा (Virat Kohli) लेक वामिकासोबतचा (Vamika) हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 19 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आपली लाडकी लेक वामिकाला (Vamika) पॅपराजींपासून दूर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. अनुष्क आणि विराटसोबत वामिका तिसऱ्यांदा घराबाहेर दिसून आली आहे. नुकतीच ती मुंबई विमानतळावरसुद्धा (Mumbai airport) दिसली. त्यावेळी अनुष्काने तिला आपल्या छातीशी घट्ट धरलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सध्या आयपीएल (IPL 2021) सुरू आहे. अनुष्का आपल्या नवरा विराटसोबत आहे. वामिकालाही ती सोबत घेऊन गेली. नुकतेच तिघेही मुंबई विमानतळावर दिसले. त्यावेळी तिघंही पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाले.

विमानतळाजवळ असलेल्या पॅपराजींच्या कॅमेऱ्याकडे अनुष्काचं लक्ष गेलं. तेव्हा तिनं आपल्या छातीजवळ असलेल्या वामिकाला आणखी घट्ट धरून घेतलं. पॅपराजींपासून वामिकाला वाचवण्याचा आणि त्यांच्यापासून तिला दूर ठेवण्याचा तिने प्रयत्न केला. फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी आपल्या यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हे वाचा - बाळासाठी स्तनपान का महत्वाचं? अभिनेत्रीची मातांसाठी भावनिक पोस्ट

सेलिब्रिटीजच्या (Celebrities) वैयक्तिक आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. अनेक सेलिब्रिटीज सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या चाहत्यांसाठी वैयक्तिक आयुष्यातील घटना, गोष्टी शेअर करत असतात. सध्या सेलिब्रिटीजची लहान मुले हा चाहत्यांच्या आकर्षणाचा विशेष केंद्रबिंदू ठरताना दिसतो. सोशल मीडियावर या मुलांचे फोटो, व्हिडीओला विशेष पसंती मिळताना दिसते. त्यामुळे असे फोटो मिळवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी छायाचित्रकार (Paparazzi) विशेष प्रयत्न करताना दिसून येतात.

हे वाचा - भररस्त्यात डोकं टेकलं, हात जोडले; सलमानचं नाव घेत ढसाढसा रडू लागली राखी सावंत

अनुष्का आणि विराटने मात्र आपल्या मुलीला या पॅपराजींपासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न केला. तिच्या जन्मानंतरच त्यांनी एक पोस्ट करत तशी विनंती केली होती.  कृपया आमच्या नवजात बाळाचे (मुलीचे) फोटो काढू नका, अशी विनंती विरुष्कानं फोटोग्राफर्सला केली. आपल्या नव्या आमच्या बाळाच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा, अशी विनंती करणारे पत्र या दाम्पत्यानं पापाराझ्झींना लिहिलं होतं.

First published:

Tags: Anushka sharma, Entertainment, IPL 2021, Virat kohali