मुंबई, 12 ऑगस्ट- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पन्नाशीतही मलायका तितकीच फिट आणि स्टाईलिश आहे. अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे ती सतत ट्रोलदेखील होतं असते. मात्र यावेळी मलायका एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. मलायकाने आपली एक इच्छा जाहीर केली आहे. मलायकाची ही इच्छा ऐकून सर्वांनाचं तिचं कौतुकही वाटत आहे.
View this post on Instagram
एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मलायकाने म्हटलं आहे, ‘तिला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. याबद्दल तिने आपला मुलगा अरहानलादेखील सांगितलं आहे. मलायकाने म्हटलं आहे. मी माझ्या मुलावर सर्वात जास्त प्रेम करते. हे नातं जगातील खुपचं सुंदर नातं आहे. मात्र मला सुरुवातीपासूनचं एका मुलीची आई व्हायचं होतं. कारण मी ज्या कुटुंबातून आहे. तिथे सर्वात जास्त मुलीचं आहेत. त्यामुळे मला मुलींबद्दल खूपच ओढ आहे. मी एका मुलीला दत्तक घेऊन तिला एक सुंदर आयुष्य देऊ इच्छिते’.
(हे वाचा: BB OTT: पाहा कोणाचे किती आहेत इन्स्टाग्राम फॉलोअर्स?; कोण आहे सर्वात पुढे?)
सध्या याबद्दल काहीही नियोजन झालेलं नाहीय. मात्र माझी ही इच्छा आहे. पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मलायकाने म्हटलं आहे. ‘माझ्या अनेक मित्रांनी मुले दत्तक घेतली आहेत. त्यामुळे मलाही ही इच्छा आहे. मी याबद्दल माझ्या मुलाशीदेखील बोलले आहे. माझा मुलगा माझ्या प्रत्येक गोष्टीत मला सहकार्य करतो. आमच्या घटस्फोटामुळे तो अस्वस्थ झाला होता. मात्र वेळेनुसार त्याला सर्व गोष्टींचा उलघडा होतं गेला. त्यालाही कळालं की आम्ही एकत्र राहून आनंदी नाही. त्यामुळे आमचं विभक्त होणंचं योग्य होतं.
(हे वाचा: 'तुम्ही सर्व गाढव आहात'; मुलाच्या नावावरून करीनाला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली स्वरा)
मलायकाने अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. तब्बल 16 वर्षे त्यांचा हा संसार चालला. मात्र 2017 मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेतला आहे. सध्या मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज खानसुद्धा विदेशी अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघेही आपल्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Malaika arora