मालदिव, 02 जानेवारी: मालदिवला (Maldive) भटकंतीसाठी (Tourism) गेलेली बाॅलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) अनन्या पांडेनं (Ananya Panday) मालदिवमधील निळ्या समुद्रात (Blue sea) छोट्या शार्कसोबत (Baby Shark) खेळतानाचा व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. जणू काही तो तिचा मित्रच झाला आहे.
अभिनेत्री अनन्या पांडे नव्या वर्षाचे स्वागत मालदिव येथील समुद्र किनाऱ्यावरुन केले. यावेळी रिलॅक्स मूडसचे आणि समुद्राचे विविधांगाने सौंदर्य टिपणारे फोटो आणि व्हिडीओ तिने चाहत्यांसाठी शेअर केले. तिच्या काही पोस्टमधून तिचा अवखळपणा किंवा अगदी वेडेपणा दिसून येतो. असे असले तरी तिच्या चाहत्यांना या पोस्ट अधिकच मोहक वाटतात.
या तरुण अभिनेत्रीने तिच्यासोबत पाण्यात पोहोत असलेल्या छोट्या शार्कसचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. इन्स्टा स्टोरीत व्हिडीओ अपलोड करताना तिने या छोट्या शार्कच्या अनुषंगाने पार्श्वगीत वापरले आहे, असा अंदाज हा व्हिडीओ पाहताना येतो. डुईंग ग्रोन अप थिंग्ज अशा आशयाचे कॅप्शन तिने यात दिले आहे. बेबी शार्क हे लहान मुलांचे गाणे असून ज्यात शार्कच्या कुटुंबाचे वर्णन केले आहे.
कॅम्पफायर साँग म्हणून हे गाणे विशेष लोकप्रिय असून दक्षिण कोरियन शैक्षणिक कंपनीने (South Korean Education Company) या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर 2016 पासून त्याचा वापर बंद झाला होता.
अनन्या मालदिवमध्ये खाली-पिली स्टार ईशान खट्टरसोबत (Isshan Khattar) सुट्टयांचा आनंद घेत आहेत. या दोघांनी नवीन वर्षाच्या पहिल्या संध्याकाळी रमणीय बेटांची एक झलक आपल्या हॅलिडे डायरीच्या माध्यमातून सोशल मिडीयाव्दारे चाहत्यांसोबत शेअर केली.
2020च्या अखेरच्या दिवशी ईशानने अनन्यासोबत पाण्यात झोका खेळतानाचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करीत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. निळ्या समुद्राच्या मध्यभागी अनन्यासोबत एक चित्तथरारक फोटो त्याने माय पॅनोरमा (My Panorama) असे कॅप्शन देत शेअर केला.
बिकीनी परिधान केलेले लक्षवेधी फोटो शेअर करीत या अभिनेत्रीने नवीन वर्षाचे स्वागत केले. अनन्याची आई भावना आणि शनाया कपूरची आई महीप यांनीही हे फोटो लाइक केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Bollywood News