मुंबई, 10 नोव्हेंबर- अलीकडेच, सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर ऐश्वर्या सिंग (Aishwrya Singh) तिच्या बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सारख्या लूकसाठी चर्चेत होती. कियाराने स्वतः ऐश्वर्याचा एक इंस्टाग्राम रील शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने 'शेरशाह' मधील एक सीन पुन्हा तयार केला आहे. आता आणखी एक अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) लूक इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या तरुणीचे नाव सेलेस्टी बैरागे (Celesty Biarage) असून ती मूळची आसामची आहे. सेलेस्टीचा चेहरा इतका आलिया भट्ट सारखा दिसतो कि सोशल मीडियावर लोक तिला 'छोटी आलिया भट्ट' म्हणू लागले आहेत.
View this post on Instagram
आलिया भट्ट सारख्याच लूकमुळे सेलेस्टीने इंटरनेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. फोटो शेअरिंग अॅपवर तिचे 35.4K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. जे तिच्या प्रत्येक पोस्टवर लक्ष ठेवतात. या इन्फ्ल्यूएंसरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये ती तिची मेहंदी दाखवताना दिसत आहे. पण, कॅमेऱ्याच्या फ्लॅशने ती घाबरते आणि मग जोरजोरात हसायला लागते.व्हिडीओमध्ये ती इतकी आलिया भट्टसारखीच दिसत आहे की कोणालाही तिला 'आलिया' म्हणायला भाग पडेल .
केवळ सेलेस्टीचा चेहराच नाही तर तिचे हास्यसुद्धा थेट आलियालासारखे आहे. आणि त्यामुळेच तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना सोशल मीडिया यूजर्स सेलेस्टीची तुलना आलियाशी करत आहेत. हिरव्या लेहेंग्यात सेलेस्टीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आलियाच्या '2 स्टेट्स' चित्रपटातील 'मस्त मगन' गाण्यात फिरताना दिसत आहे.
View this post on Instagram
आलिया भट्टबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री सध्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. आलियाने नुकतेच 'डार्लिंग'चे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याच वेळी, तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे एसएस राजामौलीचा 'आरआरआर'सुद्धा आहे, ज्याद्वारे आलिया दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. संजय लीला भन्साळी आणि फरहान अख्तर यांच्या जी ले जरा यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातही ती दिसणार आहे. आलियाने रणवीर सिंगसोबत तिच्या आगामी रॉकी और रानी या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे.दरम्यान तिच्या आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या चर्चानींही जोर धरला आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये हे दोघे लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment