मुंबई, 20 मार्च: गेली वर्षभर जगात कोरोनाचा कहर चालू आहे. (coronavirus) अतिशय शर्तीच्या प्रयत्नांमुळे कोरोनावर लस उपलब्ध झाली आहे. (coronavirus vaccine) मात्र लसीचा पुरवठा अपुरा असल्याने शासनाकडून लसीकरणासाठी काही नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि वयोवृद्ध लोकांना प्राधान्य दिलं जात आहे. काही लोकांनी लसीचा नकारात्मक परिणाम होत असल्याचं सांगत लसीकरणापासून स्वतःला दूर ठेवलं आहे. तर काही लोक अगदी जबाबदारीनं लस टोचून घेत आहेत. मात्र लसीकरणासाठी काही अडचणीसुद्धा येत आहेत. (vaccination in india)
The trailer is out! #ItHappenedInHongkong #AahanaInHongkong #Hongkong #Trailer @amolparashar @Viu_IN https://t.co/3e0r6gYUNT
— Aahana Kumra ll❤︎ ❤︎ (@AahanaKumra) March 1, 2018
अवश्य पाहा - सुपरहिट चित्रपटासाठी अभिषेकनं लढवली अनोखी युक्ती; नावात केला हा बदल
सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कलाकार मंडळीसुद्धा आपल्या घरातील जेष्ठ मंडळींना लसीकरणास प्रोत्साहन देत आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे अहाना कुमरा. अहाना कुमराच्या आई-वडिलांनी नुकताच कोरोना लसीकरण करून घेतलं आहे. मात्र इतर नागरीकांप्रमाणे तिला सुद्धा अडचणीचा सामना करावा लागला आहे. त्यासाठी अहानानं थेट केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे.
अवश्य पाहा - ‘Corona खरंच आहे कि हे नाटक पैशांसाठी सुरू केलंय’; जुई गडकरीचा सरकारला सवाल?
"माझा आई-वडिलांनी 9 मार्च 2021 रोजी 10 वाजून 53 मिनिटांनी कोरोनाची लस घेतली आहे. मात्र रेकॉर्डमध्ये लसीकरणाची चुकीची वेळ दाखवली जात आहे. त्याचबरोबर कोरोना लसीकरणाचं प्रमाणपत्रसुद्धा डाऊनलोड होत नाही. यात मला काही मदत मिळू शकते का?" अशा आशयाचं ट्विट करुन तिनं आरोग्य मंत्र्यांकडे मदत मागितली आहे.
तिच्या या ट्विटवर अनेक लोकांनी उत्तर दिलं आहे. त्यातील एका युजर्सनं म्हटलं आहे. तुम्ही परत एकदा तपासून पहिला तर बरं होईल. तसेच तुम्ही एकदा हॉस्पिटलमध्ये सुद्धा चौकशी करू शकता त्याचबरोबर डॉक्टर्ससोबत बोलूनही बघू शकता. काहीतरी चूक झाली असेल. त्यानंतर अहानाने रिट्वीट करत म्हटलं आहे. मी वारंवार याचा पाठपुरावा करत आहे. अनेकवेळा चौकशीसुद्धा करून पाहिलं. मात्र मला हॉस्पिटलकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच ती म्हणते असं फक्त आमच्यासोबतच नव्हे तर अनेक लोकांच्यासोबत घडत असेल. @drharshvardhan plzहेल्प असं सुद्धा लिहिलं आहे.
(हे वाचा: ग्लॅमरस अभिनेत्री शेतात चालवतेय नांगर; Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क)
अहाना कुमरा ही एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आहे. अहानानं सोनी वाहिनीवरील ‘युधि’या कार्यक्रमातून बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आगामी काळाबद्दल बोलायचं झालं तर आहानानं नुकताच मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाच चित्रीकरण पूर्ण केलं आहे. या चित्रपटात ती अभिनेता प्रतिक बब्बर सोबत झळकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Coronavirus, Covid cases