• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • 'तो सीन तुम्ही पाहाल तेव्हा...', Radhe मध्ये सलमान खानला Kiss करण्याबाबत दिशा पाटनीचा खुलासा

'तो सीन तुम्ही पाहाल तेव्हा...', Radhe मध्ये सलमान खानला Kiss करण्याबाबत दिशा पाटनीचा खुलासा

राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई (Radhe : Your Most Wanted Bhai) ही सलमान खानची बहुप्रतीक्षित फिल्म त्यातील सलमानच्या किसिंग सीनमुळेही चर्चेत आहे.

  • Share this:
मुंबई, 11 मे : संपूर्ण देश कोरोना महासाथीचा सामना करतो. अशा परिस्थितीतही बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई (Radhe : Your Most Wanted Bhai) हा चित्रपट ईद 2021 या दिवशीच रिलीज करत आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हा चित्रपट रखडला होता. आता रिलीज होत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं आणि आनंदाचं वातावरण आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) प्रमुख भुमिकेत आहे. नुकतंच दिशाने सलमान खान सोबतच्या किसिंग सीनबाबतही (Kissing Scene) खुलासा केला आहे. कोइमोइशी बोलताना दिशा पाटनीने या चित्रपटाशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या. तसंच दिग्दर्शक प्रभुदेवा (Prabhu Deva)सोबत झालेल्या चर्चेविषयी देखील तिनं सांगितलं. शूटिंगदरम्यान सेटवरील उत्साही आणि आनंदी वातावरण तसंच चित्रपटाच्या अनुषंगाने अनेक बाबी शेअर केल्या. दिशाने सलमान सोबतच्या बहुचर्चित किसिंग सीनविषयीही खुलासा केला. दिशा आणि सलमान यांच्यातील हा सीन पाहून सलमानने ऑनस्क्रीन किस न करण्याची पॉलिसी मोडली का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. परंतु, सुपरस्टार सलमान खानने आपले तोंड टेपने झाकून घेतल्याचं नंतर स्पष्ट झाले. राधे चित्रपटासाठी अशा सीनची गरज होती, असं खुद्द सलमानने एका व्हिडीओत बोलताना सांगितलं. हे वाचा - दिशा पाटनीचा कॅज्युअल लूक ठरतोय फॅशन इन्स्पिरेशन, पाहा PHOTOS परंतु यामुळे दिशा पाटनी ही पहिली अभिनेत्री ठरली की जिच्यामुळे सलमान आपली पॉलिसी तोडण्याच्या अगदी जवळ गेला. याबाबत बोलताना दिशा म्हणाली, "शेवटी आम्ही सर्वजण कलाकार आहोत आणि चित्रपटासाठी असा सीन आवश्यक होता. तुम्ही हा सीन एकदा जरी पाहिलात तरी तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. दिग्दर्शक आम्हाला जे सांगतो ते आम्ही करत असतो. सलमानने वास्तवात किस केलेलं नाही, त्यामुळे मला नाही वाटत की त्याने कोणत्याही प्रकारच्या नियमाचं उल्लंघन केलं आहे" हे वाचा - 'मला अचानक पाठीमागून धरलं आणि'...अभिनेता सुव्रत जोशीने सांगितला धक्कादायक अनुभव. यावेळी दिशानं कोरोना काळात हा चित्रपट रिलीज करण्यामागील भूमिका मांडली. "मी खूप आभारी आहे की अशा काळात आमचा चित्रपट रिलीज होतो आहे. हा चित्रपट गेल्या 1 वर्षापासून रखडला आहे. त्यामुळे अखेरीस हा चित्रपट रिलीज होत असल्यानं मी खूप आनंदी आहे. खासकरुन या कठीण परिस्थितीतही हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे मनोरंजन करेल", अशी आशा असल्याचं अभिनेत्री दिशा पाटनी हिने सांगितलं.
First published: