...आणि रणवीर दीपिकाला म्हणाला, 'मला मारून टाक'!

...आणि रणवीर दीपिकाला म्हणाला, 'मला मारून टाक'!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या नव्या लूकचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 09 डिसेंबर: बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh)यांची जोडी बॉक्स ऑफिसवर जेवढी लोकप्रिय आहे तेवढीच रिअल लाइफमध्येही चाहत्यांमध्ये लोकप्रिय असल्याचं पाहायला मिळतं. लग्नानंतर दोघांचीही रोमॅन्टीक केमेस्ट्री सोशल मीडियावर पाहायला मिळते. दीपिकाच्या फोटोंवर चाहते घायळ होत असतात. यावेळीही असंच काहीसं झालं आहे. दीपिकाने आपला लूक चेंज केल्यानंतर तिने फोटो इन्टाग्रामवर शेअर केले. तिचा हेअरकट हा चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. नव्या हेअरकटमधील फोटो दीपिकाने तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केला त्यावर पती रणवीर सिंहने रिल्पाय दिला आहे.

दीपिका पादुकोणने आपल्या नवीन हेअरकटचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत 'Tadaaa...' असं लिहिलं आहे.

View this post on Instagram

Tadaaaaa!!!💁🏽‍♀️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या नव्या लूकमध्ये रविवारी दीपिकाने स्टार स्क्रिन अवॉर्ड्सना हजेरी लावली. काळ्या रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये दीपिका शोभून‌ दिसत होती. हा नवा लूक तिला खूप आवडलाय असंही तिने तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितलं

View this post on Instagram

DND!Im very involved as you can see...(with the new look!)😋

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंटस येत आहेत. तिच्या नव्या हेअरस्टाइला चाहत्यांनी पसंती दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिकाने ब्लॅक गाऊन घातला आहे. तिच्या या नव्या लूकवर चाहते पुरते घायाळ झाले आहेत. दीपिकाच्या नव्या हेअरकटवर पती रणवीरने 'मार दो मुझे' अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरची केमिस्ट्री काय रंगताना चाहत्यांना पाहायला मिळते. दीपिकाच्या या हेअरस्टाइलवर चाहतेही घायाळ झाले आहेत. रणवीरसह बॉलिवूडमधील इतर कलाकरांनीही दीपिकाच्या या नव्या हेअरस्टाइलवर कमेंट केली आहे. omg...ब्युटी! अशी कमेंट बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 9, 2019, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading