Home /News /entertainment /

ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचं निधन; 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचं निधन; 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेता(Actor) युसूफ(Yusuf Hussain Passes Away) हुसेन यांचं निधन झालं आहे.

    मुंबई, 30ऑक्टोबर- ज्येष्ठ अभिनेते  (Actor)  युसूफ  (Yusuf Hussain Passes Away)  हुसेन यांचं निधन झालं आहे. बॉलीवूड आणि टीव्हीचा प्रसिद्ध चेहरा असलेल्या युसूफ हुसैन यांच्या निधनाची माहिती देत दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. निर्माता आणि अभिनेते युसूफ हुसैन यांच्या निधनाने हंसल मेहता हादरून गेले आहेत. जड अंत:करणाने ही दुःखद माहिती देताना त्यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे की, 'मी आज खऱ्या अर्थाने अनाथ झालो आहे. आता माझं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही.'' रात्री उशिरा 3 वाजून 30 मिनिटांनी त्यांनी हे ट्विट केलं आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्यांच्या पोस्टसोबत युसूफ हुसैन यांचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, की 'मी शाहिदचे 2 शेड्युल पूर्ण केले होते आणि आम्ही अडचणीत होतो. मी खूप अडचणीत होतो. माझी फिल्ममेकर म्हणून कारकीर्द संपणार होती. तेवढ्यात ते आले आणि मला म्हणाले माझ्याकडे फिक्स डिपॉझिट आहे. जर ते पैसे तुमच्या अडचणीत कामी आले नाहीत तर मलाही त्याचा काहीच उपयोग नाही. युसूफ हुसैन यांना आठवत त्यांनी पुढं लिहिलं की, 'त्यांनी चेकवर सही केली आणि शाहिद पूर्ण झाला.असे होते युसूफ हुसेन. हंसल मेहता यांनी पुढे लिहिले- 'ते केवळ माझे सासरेच नाही तर ते मला माझ्या वडिलांसारखं होते. जर आयुष्य एका शरीराच्या रूपात जिवंत असतं. तर कदाचित त्यांच्यासारखा असतं. आज ते निघून गेले. जेणेकरून स्वर्गातील सर्व मुलींना 'जगातील सर्वात सुंदर मुलगी' आणि प्रत्येक पुरुषाला 'सर्वात सुंदर तरुण' म्हणता येईल. आणि शेवटी फक्त 'लव्ह यू लव्ह यू लव्ह यू' इतकंच म्हणता येईल.' दिग्दर्शक हंसल मेहता यांचं ट्विट. हंसल मेहता यांनी पुढे लिहिलं- 'युसुफ सर, तुमच्या या नव्या आयुष्याचा मी ऋणी आहे. खरंच आज मी अनाथ झालो. आता आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. मला तुमची खूप आठवण येईल. आता माझी उर्दू खराबच राहील आणि हो - लव्ह यू लव्ह यू लव्ह यू.' युसूफ हुसैन यांची मुलगी सफिना हुसैन हिचं लग्न हंसल मेहतासोबत झालं आहे. युसूफ हुसेन हे हंसल मेहता यांचे सासरे होते. युसुफ साहब यांनी 2002 साली 'अब के बरस' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये टीव्हीवर यशस्वी करिअर केलं आहे. यानंतर त्यांनी 'रोड टू संगम', 'क्रेझी कुक्कड फॅमिली', 'ब्लू ऑर्गन्स', 'खोया खोया चांद', 'धूम 2', 'ओह माय गॉड', 'क्रिश 3', 'विवाह' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2018 मध्ये, ते रिया चक्रवर्ती आणि वरुण मित्रासोबत पुष्पदीप भारद्वाजच्या 'जलेबी'मध्ये दिसले होते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment

    पुढील बातम्या