Home /News /entertainment /

ड्रग्ज रॅकेटबाबत मोठा खुलासा; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेताच मास्टरमाइंड, तिघांना NCB समन्स पाठवणार

ड्रग्ज रॅकेटबाबत मोठा खुलासा; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेताच मास्टरमाइंड, तिघांना NCB समन्स पाठवणार

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनबाबत (bollywood drug connection) मोठी माहिती एनसीबीच्या (ncb) हाती लागली आहे.

    मुंबई, 30 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणाचा ड्रग्ज अँगलने तपास करताना बॉलिवूडमधील (Bollywood) ड्रग्ज  (Drugs) कनेक्शन समोर आलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) रडारवर बडे सेलिब्रिटी आहेत. तीन अभिनेत्रींची चौकशी सुरू आहे, तर आणखी तीन अभिनेत्यांना समन्स पाठवला जाणार आहे. दरम्यान या ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाइंड एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेताच (bollywood actor) असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीच्या हाती मोठी माहिती लागली आहे. बॉलिवूडमधील या ड्रग्ज रॅकेटमागे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. तो याआधी सुपरमॉडेल राहिला आहे. अटक केलेल्या बहुतेक ड्रग्ज पेडलर्सनी या अभिनेत्याचं नाव घेतलं आहे. हा अभिनेता ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या लोकांच्या संपर्कात असतो आणि इंडस्ट्रीमधील कित्येक लोकांना ड्रग्ज मिळवून देतो. हा अभिनेता नेमका कोण हे अजून समोर आलं नाही. हे वाचा - ड्रग्ज कनेक्शनमध्ये अक्षय कुमारही? NCB च्या तपासात A नाव समोर येताच माजली खळबळ या प्रकरणात सध्या दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही चौकशी सुरू आहे. त्यांच्या चौकशीतूनही महत्त्वाची अशी माहिती मिळालेली आहे. एनसीबी लवकरच बॉलिवूडमधील आणखी तिघांना समन्स पाठवणार आहे. त्या तिघांचीही चौकशी केली जाणार आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांच्या तपासानंतर त्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून यातून मोठा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे वाचा - ड्रग्जप्रकरणी अक्षय कुमारच्या नावाची चर्चा; पत्नी ट्विंकल खन्नाचा VIDEO VIRAL अनेक कलाकारांविरोधात एनसीबी लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे. तपास करणाऱ्या टीमला 6 महिन्यातं चार्जशीट दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला आधीच अटक झाली आहे. आतापर्यंत कमीत कमी 18 जणांना अटक करण्यात आली आहे. शिवाय अजूनही  20 पेक्षा अधिक ड्रग्ज पेडलर्सवर एनसीबीची नजर आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या