मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'गँग्स ऑफ वासेपुर' फेम अभिनेत्याने मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ; Wedding फोटो VIRAL

'गँग्स ऑफ वासेपुर' फेम अभिनेत्याने मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ; Wedding फोटो VIRAL

अभिनेता विनीत कुमार सिंगने   (Vineet Kumar Singh)  नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंद्वारे विनीतने सांगितले की, त्याने त्याची लॉंगटाईम गर्लफ्रेंड रुचिरा गोरमारेसोबत   (Ruchira Gormaray)   लग्न केले आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 डिसेंबर -   अभिनेता विनीत कुमार सिंगने   (Vineet Kumar Singh)  नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंद्वारे विनीतने सांगितले की, त्याने त्याची लॉंगटाईम गर्लफ्रेंड रुचिरा गोरमारेसोबत   (Ruchira Gormaray)   लग्न केले आहे. आपल्या लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर करताना विनीतने भावुक करणारी नोटही लिहिली आहे. यामध्ये त्याने आपल्या लग्नाची तारीखही उघड केली आहे. विनीतने अगदी खाजगी पद्धतीने लग्न केलेआहे. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.

विनीत कुमार आणि रुचिरागोतमारेने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विनीत वराच्या पोशाखात दिसत आहे. तर रुचिरा गोरमारे वधूच्या पोशाखात आहे. एका फोटोंमध्ये दोघेही लग्नाच्या मंडपात अग्नीजवळ बसले आहेत. तर दुसऱ्या चित्रात दोघेही उभे राहून फोटोसाठी पोझ देत आहेत. विनीतप्रमाणे रुचिरानेही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हेच फोटो शेअर केले आहेत. विनीतने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रुचिरा ही एक महाराष्ट्रीयन मुलगी आहे. ती मराठमोळी अभिनेत्री आहे.

हे फोटो शेअर करत विनीत कुमारने लिहिले की, "29/11/2021 मी तुझा हात धरून इथपर्यंत आलो आहे. तु माझ्या आयुष्यात आहेस ही गोष्ट मला खरोखरच धन्य वाटते! रुचिरा. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार." विनीत कुमारच्या या पोस्टवर त्याचे मित्र आणि इंडस्ट्रीशी संबंधित लोक आणि चाहते त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

(हे वाचा:'लग्न कधी करणार ?' यावर अंकिता लोखंडेची अशी होती प्रतिक्रिया, video viral )

हे कपल 8 वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. एका न्यूज पोर्टलशी बोलताना विनीत कुमार म्हणाले की, ते दोघे एकमेकांना गेल्या आठ वर्षांपासून ओळखत आहेत आणि रुचिरा त्यांच्या प्रवासात अनेक चढ-उतारांमध्ये त्याच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा अंतिम निर्णय घेतला. ते 2020 मध्ये लग्न करण्याचे ठरवत होते. परंतु कोविड -19 च्या अनिश्चिततेमुळे ते पुढे ढकलले गेले.लग्नाविषयी बोलताना विनीतने सांगितले की, हे खूप इंटिमेट लग्न होते. ज्यामध्ये त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. दोघांनी हे नियोजन केले होते. त्याने महाराष्ट्रीयन आणि उत्तर भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केल्याचे सांगितले.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Entertainment