मुंबई, 18 मार्च: अभिनेता विक्रांत मेस्सी (
Vikrant Massey) त्याच्या पॉवरपॅक्ड परफॉरमन्ससाठी ओळखला जातो. वेबसीरिज पासून सिनेमापर्यंत अभिनेत्याने त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या विक्रांत त्याचा लेटेस्ट सिनेमा ‘लव्ह हॉस्टेल’ (
Love Hostel) मुळे चर्चेत आहे. या सिनेमात तो आशु ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेतून त्याने प्रेक्षक आणि चाहते दोघांचेही मन जिंकले आहे. लव्ह हॉस्टेलमध्ये विक्रांत मेस्सी, (
Love Hostel Vikrant Massey) सान्या मल्होत्रा (
Sanya Malhotra) आणि बॉबी देओल (
Bobby Deol) यांच्यासह स्क्रीन शेअर करत आहे.
विक्रांत मेस्सीने या सिनेमासाठी मिळालेल्या फीजबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्याने असे म्हटले आहे की, त्याने या सिनेमासाठी अर्ध्याहून कमी शुल्क आकारले आहे. ETimes शी बोलताना विक्रांत याबाबत म्हणाला की, लव्ह हॉस्टेल माझ्या करिअरमधील एकमेव असा सिनेमा आहे, ज्यासाठी मला माझ्या फीजपेक्षी अर्धी फी देण्यात आली आहे. कारण सिनेमा एका निश्चित बजेटमध्ये बनणार होता. अगदी सुरुवातीपासूनच निर्मात्यांसाठी पैसे न गमावणे हे मुख्य प्राधान्य होते, त्यातून तुम्हाला समजून जाते की तुम्हाला तुमची फी कमी करावी लागेल.'
हे वाचा-द काश्मीर फाइल्सनंतर कंगनासह विवेक अग्निहोत्री करणार सिनेमा, लवकरच होणार घोषणा?
विक्रांत पुढे म्हणाला की, 'तुम्ही ते स्वीकारता कारण तुम्हाला चित्रपटाबद्दल मनापासून वाटत आहे. रेकॉर्ड शेअर करायलाही माझी हरकत नाही. माझी टीम माझ्या निर्णयाबद्दल थोडी घाबरली होती कारण मला माझ्या फीच्या निम्मेही पैसे मिळत नव्हते. पण, मला हे करायचे होते आणि मी ते केले.' विक्रांतने असेही सांगितले की, जेव्हा तुम्ही चित्रपट साईन करता तेव्हा पैसा हा खूप महत्त्वाचा विषय असतो, पण तो ड्रायव्हिंग फॅक्टर नसतो.
तो असंही म्हणाली की, 'पैसा खूप महत्त्वाचा आहे. कारण, तुम्ही तुमच्या सेवा देत आहात. तुम्हाला एक चांगला चित्रपट बनवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला मोबदला दिला जातो. ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु, काहीवेळा तुम्हाला तुमच्या फीज कमी कराव्या लागतात. 'अ डेथ इन द गुंज' हा आणखी एक चित्रपट होता, कारण तो माझ्यासाठी एक उत्तम संधी होता. मला वाटतं पैसाच सर्वस्व नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.