मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विकी कौशलनं असं दिलं होतं आपलं पहिलं ऑडिशन; 9 वर्ष जुना PHOTO व्हायरल

विकी कौशलनं असं दिलं होतं आपलं पहिलं ऑडिशन; 9 वर्ष जुना PHOTO व्हायरल

2012 पासून त्याने अनेक चित्रपटांत सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.

2012 पासून त्याने अनेक चित्रपटांत सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.

2012 पासून त्याने अनेक चित्रपटांत सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.

मुंबई, 10 जुलै- बॉलिवूडमधील (Bollywood) एक उत्कृष्ट कलाकार म्हणून विकी कौशल(Vicky  Kaushal) नावारूपाला आला आहे. त्याने अगदी कमी वेळेत खूप मोठं यश मिळवलं आहे. आज त्याच्या या प्रवासाला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. विकीने नुकताच आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत हा आनंद व्यक्त केला आहे. विकीने आपल्या ऑडीशनच्या दिवसांतील एक फोटो शेयर (Share Photo) केला आहे. हा फोटो पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.

अभिनेता विकी कौशल बॉलिवूडमधील एक उत्तम कलाकार समजला जातो. त्याने आपल्या करीयरमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा क्स दाखवला आहे. विकीने इलेक्ट्रोनिक्स इंजीनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे. मात्र त्याला सुरुवातीपासूनचं अभिनयाची आवड होती. त्यामुळे तो या क्षेत्राकडे वळला. त्याचे वडील एक स्टंट दिग्दर्शक आहेत. त्यांनी स्लमडॉग करोडपती आणि 3 इडियटस आणि बजरंगी भाईजानमध्ये काम केलं आहे. विकीचा भाऊ सनीसुद्धा चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. मात्र विकीला एक अभिनेता बनायचं होतं. त्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले.

(हे वाचा: दीपिका पादुकोण प्रेग्नेंट? अभिनेत्रीला ढगळ्या कपड्यांमध्ये पाहून रंगली चर्चा)

सुरुवातीला त्याला काही चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका मिळाल्या होत्या. 2012 पासून त्याने अनेक चित्रपटांत सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिली ती 2016 मध्ये आलेल्या ‘मसान’ या चित्रपटाने. या चित्रपटाला अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले होते. तसेच त्याने मनमर्जीयां, लस्ट स्टोरीज, लव्ह पर स्क्वेयर फिट अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर 2018 मध्ये आलेल्या ‘राझी’ या चित्रपटासाठी त्याचं खुपचं कौतुक झालं होतं. तर 2019 मध्ये आलेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी तर त्याला चक्क राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

(हे वाचा:असं हे बॉलिवूड! ‘दिलीपकुमार यांचं सकाळी निधन अन् नीतू कपूर यांनी केली पार्टी’  )

विकीने खुपचं कमी काळात खूप मोठं यश संपादन केलं आहे. आज बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. आज विकिच्या या स्ट्रगलला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत.  त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेयर करत याची माहिती दिली आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Vicky kaushal