मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अरुणाचल प्रदेशच्या धरतीवर 'भेडिया' बनला 'भाग मिल्खा भाग'; शर्टलेस होवून धावणाऱ्या वरुणचा VIDEO व्हायरल

अरुणाचल प्रदेशच्या धरतीवर 'भेडिया' बनला 'भाग मिल्खा भाग'; शर्टलेस होवून धावणाऱ्या वरुणचा VIDEO व्हायरल

Bhediya Shooting Video: अरुणाचल प्रदेशच्या रिकाम्या रस्त्यावर वरुण धवन शर्टलेस होवून धावताना (Varun Dhawan Shirtless Running) दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

Bhediya Shooting Video: अरुणाचल प्रदेशच्या रिकाम्या रस्त्यावर वरुण धवन शर्टलेस होवून धावताना (Varun Dhawan Shirtless Running) दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

Bhediya Shooting Video: अरुणाचल प्रदेशच्या रिकाम्या रस्त्यावर वरुण धवन शर्टलेस होवून धावताना (Varun Dhawan Shirtless Running) दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

इटानगर, 19 मार्च: बॉलीवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये असून तो आपल्या आगामी 'भेडिया' (Bhediya Film) या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. असं असतानाही तो व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढून धमाल करताना दिसत आहे. अलीकडेच तो स्थानिक चाहत्यांना भेटताना दिसला होता. तर आता तो अरुणाचल प्रदेशच्या रिकाम्या रस्त्यावर शर्टलेस होवून धावताना (Varun Dhawan Shirtless Running) दिसत आहे. त्याने हा व्हिडिओ शुक्रवारी आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून शेअर केला आहे. जो वेगाने सोशल मीडियात व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

या व्हिडिओ मध्ये वरुण धवन फिटनेस प्रेमी देवरथ विजय सोबत धावताना दिसत आहे. खरंतर अरुणाचल प्रदेशच्या डोंगराळ भागातील या चढ्या पद्धतीच्या रत्यावर दोघांनी धावण्याची शर्यत लावली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, वरुण धवनने फिटनेसप्रेमी देवरथ विजयला हारवलं आहे. खरंतर वरुण धवनही आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरूक आहे. तो अनेकदा जिममध्ये व्यायाम करताना दिसतो. त्याचे अनेक व्हिडिओ त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एवढंच नव्हे, तर वरुणने त्याच्या नवीन आलिशान घरात देखील इनबिल्ड जिम तयार केली आहे. यावरून फिटनेसच्या बाबतीत त्याची आवड लक्षात येऊ शकते.

वरुण धवनने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाचं व्हायरल होतं असून अनेक चाहत्यांनी त्याच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. अवघ्या सहा तासांत या व्हिडिओला 6 लाख 32 हजार 984 लाइक मिळाले आहे. हे लाइक वेगाने वाढताना दिसत आहेत. वरुणच्या या व्हिडिओबर बॉलिवूडच्या अनेक मंडळींनी कमेंटच्या माध्यमातून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला आमिर खानच्या 1992 सालच्या 'जो जीता वहीं सिकंदर' या चित्रपटाचं टायटल सॉंग वाजत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एक वेगळा अनुभव देत आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

हे ही वाचा - लांडगा आला रे आला! वरुण धवनचा हा VIDEO तुम्ही पाहिलात का?

'भेडिया' या वरुण धवन आणि क्रिती सेनन मुख्य मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. 'भेडिया' हा हॉरर चित्रपट युनिवर्सच्या बॅनरखाली निर्मित केला जात आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजानच्या मेडॉक फिल्म्सकडून केली जात आहे. वरुण धवन आणि क्रिती सेननचा 'भेडिया' हा चित्रपट विनोदी आणि भितीदायक गोष्टींनी परिपूर्ण भरलेला आहे. याची एक झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन 'स्त्री' आणि 'बाला' या अप्रतिम कलाकृती बनवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अमर कौशिक करत आहेत.

First published:

Tags: Varun Dhawan, Viral video.