अभिनेता सुशांत सिंहला व्हायचं होतं मॅकॅनिकल इंजीनिअर, परीक्षेत पटकावला होता सातवा क्रमांक!

अभिनेता सुशांत सिंहला व्हायचं होतं मॅकॅनिकल इंजीनिअर, परीक्षेत पटकावला होता सातवा क्रमांक!

सुशांत सिंह 12 वीत असतानाच मातृछत्र हरपलं..

  • Share this:

मुंबई, 14 जून: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनं राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूड क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

सुशांतसिंग राजपूत एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला. 'काय पो छे!' या चित्रपटात सुशांत मुख्य अभिनेता होता. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेल्या एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातही काम केलं होतं.

हेही वाचा... एका आठवड्याआधीच सुशांतनं दिले होते आत्महत्येचे संकेत?

तसं पाहिलं तर सुशांतची इंजीनिअर व्हायची इच्छा होती. अभ्यासातही तो हुशार होता. सुशांतने सन 2003 मध्ये दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया सातवे रॅकिंग प्राप्त केले होते. नंतर सुशांत सिंहने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमध्ये ( दिल्ली टेक्निकल यूनिव्हर्सिटी) मॅकॅनिकल इंजीनियरिंगचा अभ्यास सुरू केला होता. मात्र, कॉलेजच्या तिसऱ्या वर्षांतच त्यानं शिक्षण अर्ध्यात सोडलं आणि अॅक्टिंग शुरू केली होती. नंतर सुशांतनं अल्पावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.

सुशांत हा फिजिक्समध्ये नॅशनल ओलंपियाड विनर होता. आईएसएम (धनबाद) सहीत त्यानं जवळपास 11 इंजीनिअरिंग परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या.

हेही वाचा... अभिनेता सुशांतसिंह राजपूतने का केली आत्महत्या? मुंबई पोलिसांचा खुलासा

12 वीत असतानाच मातृछत्र हरपलं..

सुशांत 12 वीत असतानाच थियेटर आणि डान्स क्लास जॉईन केला होता. मात्र, ते करण्यासाठी त्याला अभ्यासातून त्याला वेळ मिळत नव्हता. त्यात सुशांतच्या आईचं निधन झालं. अकाली मातृछत्र हरपल्यानं सुशांत प्रचंड दु:खी झाला होता. मात्र, यातून सावरून त्यानं अभ्यासावर आपलं लक्ष केंद्रीत केलं होतं.

First published: June 14, 2020, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading