Home /News /entertainment /

सुशांतची बहिण पुन्हा झाली भावुक; शेअर केली अभिनेत्याची शेवटची पोस्ट

सुशांतची बहिण पुन्हा झाली भावुक; शेअर केली अभिनेत्याची शेवटची पोस्ट

चार बहिणींमध्ये सुशांत हा एकुलता एक भाऊ होता. या कुटुंबाने आत्ता सुशांतच्या मृत्यूचं सत्य मान्य केलं आहे. मात्र भावाची आठवण या बहिणींना जूनही रडवते. सुशांतची बहीण श्वेता किर्तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सुशांतच्या एका इन्स्टा पोस्टला शेयर केलं आहे. आणि त्यासोबत एक भावनिक संदेशही लिहिला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26 एप्रिल-  2020 हे वर्ष सर्वसामन्य लोक असो किंवा बॉलीवूडकर (Bollywood)  सर्वांसाठीचं अतिशय वाईट होतं. एकीकडे कोरोनाचा हाहाकार तर दुसरीकडे कित्येक बॉलीवूड कलाकारांचे निधन. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput)  मृत्यूने तर बॉलीवूडसह संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. सुशांतच्या मृत्यूला जवळजवळ दहा महिने होतं आले आहेत. तरीसुद्धा तिच्या कुटुंबियांचं दुख तीळमात्रही कमी झालेलं नाही. वारंवार त्यांचं दुख आपल्यासमोर आलं आहे. नुकताच सुशांतची बहीण(Sushant's Sister)  श्वेताने (Shweta)एक पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. पाहूया ही पोस्ट नेमकी काय आहे. चार बहिणींमध्ये सुशांत हा एकुलता एक भाऊ होता. या कुटुंबाने आत्ता सुशांतच्या मृत्यूचं सत्य मान्य केलं आहे. मात्र भावाची आठवण या बहिणींना जूनही रडवते. सुशांतची बहीण श्वेता किर्तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सुशांतच्या एका इन्स्टा पोस्टला शेयर केलं आहे. आणि त्यासोबत एक भावनिक संदेशही लिहिला आहे.
  या पोस्टमध्ये श्वेतानं लिहिलं आहे, ‘भावाची शेवटची पोस्ट...माझ्या मनात खूप यातना होतात, जेव्हा आठवत की मी तुला परत कधीचं पाहू शकणार नाही. मन पूर्ण तुटून जातं. तुटलेल्या हृदयाचे तुकडे जेव्हा आम्ही एकत्र जोडण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आमच्या लक्षात येतं. हे शक्य नाहीय.’ अशा आशयाची अत्यंत भावुक पोस्ट श्वेताने इन्स्टाग्रामवर केली आहे. (हे वाचा:‘तुमच्या योगदानाला सलाम’; इरफान आणि भानू यांना ऑस्करनं दिली आदरांजली  ) श्वेताची ही पोस्ट पाहून, चाहतेसुद्धा भावूक झाले आहेत. या पोस्टद्वारे चाहते कमेंट करून सुशांतचं आठवणींना उजाळा देतं आहेत. आणि त्याच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहेत. (हे वाचा:‘कोरोनानं माझा धडधाकट मित्र खाल्ला’; अभिनेत्याच्या मृत्यूमुळं प्रवीण तरडे भावुक  ) सुशांतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेवटची पोस्ट 3 जून 2020 रोजी केली होती. यामध्ये त्याने आपल्या आईचा आणि आपला फोटो पोस्ट केला होता. सुशांतची ती पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. या पोस्टनंतर अवघ्या 11 दिवसांनी म्हणजेच 14 जूनला सुशांतने आत्महत्या केली होती.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood, Marathi entertainment, Sushant sing rajput

  पुढील बातम्या