सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती पोलीस स्थानकात हजर, चौकशी सुरू

सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती पोलीस स्थानकात हजर, चौकशी सुरू

सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या करण्यापूर्वी रिया चक्रवर्ती हिला फोन केला होता.

  • Share this:

मुंबई, 18 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्थानकात बोलावलं होतं. त्यानंतर आता काही वेळापूर्वी रिया चक्रवर्ती बांद्रा पोलीस स्थानकात हजर झाली आहे.

सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या करण्यापूर्वी रिया चक्रवर्ती हिला फोन केला होता. त्यामुळे पोलिसांकडून तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तसंच सुशांत आणि रिया या दोघांमध्ये काही दिवसांपासून वादही सुरू होते. त्यामुळे या चौकशीनंतर पोलिसांना काही नवी माहिती मिळते का, हे पाहावं लागेल.

कोण आहे रिया चक्रवर्ती?

सुशांत सिंह राजपूतचं अंकिता लोखंडेसोबतच रिलेशनशिप आणि त्यानंतर त्यांचं झालेलं ब्रेकअप याबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे. पण अंकिता नंतर सुशांतचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. केदारनाथच्या शूटिंगच्या वेळी सुशांत आणि सारामध्ये काहीतरी कनेक्शन असल्याचं बोललं जात होतं मात्र त्या अफवा असल्याचं नंतर समोर आलं. त्यानंतर सुशांतचं नाव जोडलं गेलं ते अभिनेत्री रिया चक्रवर्तीशी. मागच्या काही दिवसांपासून हे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे आता रियाच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

सुशांतसोबत नात्यावर काय म्हणाली होती रिया?

रिया आणि सुशांतच्या रिलेशनशिपच्या चर्चा तर अनेकदा झाल्या आहेत. मात्र या दोघांनी याबद्दल कधीच कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखातीत रियानं यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली होती. सुशांत आपला बॉयफ्रेंड नाही तर एक चांगला मित्र आहे असं रियानं एका मुलाखतीत म्हटलं होतं.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 18, 2020, 12:13 PM IST

ताज्या बातम्या