...आणि कॉलेजच्या मेरिटमध्ये Sunny Leone टॉपर! लिस्ट पाहून विद्यार्थी हादरले

...आणि कॉलेजच्या मेरिटमध्ये Sunny Leone टॉपर! लिस्ट पाहून विद्यार्थी हादरले

कोलकाताच्या एका कॉलेजनं ऑनलाइन प्रवेशासाठी जाहीर केलेल्या यादीनं विद्यार्थीही हादरले, कारण यात टॉपवर नाव होते अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिचे.

  • Share this:

कोलकाता, 28 ऑगस्ट : कॉलेजची ऑनलाइन प्रक्रिया आणि घोळ हे काही नवीन नाही. मात्र कोलकाताच्या एका कॉलेजनं ऑनलाइन प्रवेशासाठी जाहीर केलेल्या यादीनं विद्यार्थीही हादरले, कारण यात टॉपवर नाव होते अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिचे. कोलकात्याच्या आशुतोष कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. या कॉलेजच्या बीए ऑनर्स (BA Honours, English) प्रवेशासाठी जारी करण्यात आलेल्या पहिल्या लिस्टमध्ये सनी लिओनीचं नाव सर्वात वर पाहून विद्यार्थीही हादरले.

एवढेच नाही तर वेबसाइटवर अपलोड करण्यात आलेल्या मेरिट लिस्टमध्ये सनीच्या नावाबरोबर अर्ज क्रमांक आणि तिचा रोल नंबरही होता. यादीमध्ये, सनीला बारावीच्या बोर्ड परीक्षेत बेस्ट ऑफ 4 अंतर्गत चार विषयात 100 पैकी 100 गुण देण्यात आले आहेत.

वाचा-अनुष्काप्रमाणे अनेक सौंदर्यवतींनी सोशल मीडियावर दिली गूड न्यूज! दाखवलं BABY BUMP

वाचा-बिग बी आणि शाहरुख खानच्या पुढे गेली ही अभिनेत्री; इन्स्टाग्रामवर 3 कोटी फॉलोअर्स

मात्र याबाबत महाविद्यालयीन अधिकाऱ्यांने हे कोणीतरी मुद्दाम केल्याचे सांगितले. कोणत्या तरी विद्यार्थ्यानं सनी लिओनीच्या नावानं अर्ज भरला. आम्ही संबंधित विभागाला ते दुरुस्त करण्यास सांगितले आहे. या घटनेचीही चौकशीही केली जाणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 28, 2020, 11:10 AM IST

ताज्या बातम्या