Home /News /entertainment /

‘देशात हे काय चाललंय?’; ऑक्सिजनच्या तुडवड्यावरुन सुनील शेट्टी संतापला

‘देशात हे काय चाललंय?’; ऑक्सिजनच्या तुडवड्यावरुन सुनील शेट्टी संतापला

corona pandemic; सुनील शेट्टी (sunil shetty)सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजूंसाठी ऑक्सिजन सिलेंडर (Oxigyn) उपलब्ध करून देत आहे.

  मुंबई, 7 मे-  देशात कोरोनाचा(Coronavirus)  विळखा वाढत चालला आहे. एकीकडे रुग्णांच्या संख्येत वाढ होतं आहे. तर दुसरीकडे मृत्यूंचा आकडा वाढत आहे. देशाला या वाईट काळातून बाहेर काढण्यासाठी अनेक कलाकार मदतीसाठी धावून आले आहेत. यामध्ये अभिनेता सुनील शेट्टीचा(Suniel Shetty)  सुद्धा समावेश आहे. सुनील शेट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजूंसाठी ऑक्सिजन सिलेंडर (Oxigyn) उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे कित्येकांना जीवदान मिळत आहे. मुंबई, बेंगलोरसोबतचं अन्य शहरांतून सुद्धा त्याच्याकडे मदतीसाठी आवाहन येत आहेत. देशातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. लोकांना आपला जीव मुठीत घेऊन सैरवैर धावावं लागत आहे. आणि लोकांच्या या परीस्थिती साठी सुनील शेट्टीने राजकीय नेत्यांना जबाबदार धरत त्यांची कानउघडणी केली आहे.
  देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होतं आहे. रुग्णांची संख्या इतक्या झपाट्याने वाढत आहे. त्यांना रुग्नालयात बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. तसेच औषधांची देखील कमतरता भासत आहेत. अशा काळात रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. ही परिस्थिती बघून सुनील शेट्टीला आपला राग अनावर झाला आहे. सुनील शेट्टीने म्हटलं आहे, देशातील नेत्यांनी जर आपलं काम चोख केलं असतं, तर आज लोकांना उपचारासाठी अशी वणवण करावी लागली नसती. आणि कित्येकांना आपला जीव गमवावा लागला नसता. (हे वाचा: करीना कपूर पोहोचली नानावटी रुग्णालयात; चाहत्यांना वाटतेय 'बेबो'ची काळजी) पुढे सुनीलनं म्हटलं आहे, जो कोणताही नेता सत्तेत येतो, तो फक्त आणि फक्त हाच विचार करतो की येत्या 5 वर्षात कशा पद्धतीने पैसा कमावता येईल. मात्र देशातील लोकांसाठी काय करायला हवं हा विचार कोणीच नाही करत. तसेच सुनील शेट्टीनं म्हटलं आहे, या नेत्यांची निवड आपणचं केली आहे. आणि यांच्यामुळेचं आपल्याला बेड आणि ऑक्सिजन शोधत भटकावं लागत आहे. (हे वाचा: शिल्पा शेट्टीच्या 1 वर्षांच्या मुलीला झाली कोरोनाची लागण ) या लोकांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी वणवण करायला लावली आहे. मात्र ही वेळ नक्कीचं बदलणार आणि ही सत्ता सुद्धा. आपण सर्वांनी मिळून अशा लोकांना निवडून देऊया जे आपला विचार करतील. आपल्या सेवेसाठी लढतील. प्रत्येक पक्षामध्ये असे लोक नक्कीच असतील. तसेच सुनीलनं म्हटलं आहे, ही वेळ एकमेकांवर आरोप लावण्याची नाहीय. तर एकमेकांना मदत करण्याची आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actor, Coronavirus, Instagram post

  पुढील बातम्या