मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सोनू सूदला बसला मानसिक धक्का; अथक प्रयत्नानंतरही नाही वाचू शकले 'त्या' मुलीचे प्राण

सोनू सूदला बसला मानसिक धक्का; अथक प्रयत्नानंतरही नाही वाचू शकले 'त्या' मुलीचे प्राण

बॉलिवूड अभिनेता(Bollywood Actor)  सोनू सूदने(Sonu Sood)  अत्यंत दुखी होतं एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यानं एका मुलीच्या मृत्यूबद्दल सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेता(Bollywood Actor) सोनू सूदने(Sonu Sood) अत्यंत दुखी होतं एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यानं एका मुलीच्या मृत्यूबद्दल सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेता(Bollywood Actor) सोनू सूदने(Sonu Sood) अत्यंत दुखी होतं एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यानं एका मुलीच्या मृत्यूबद्दल सांगितलं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 8 मे-   बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सोनू सूदने (Sonu Sood)  अत्यंत दुखी होतं एक ट्वीट केलं आहे. जवळपास एक महिना आधी सोनूने एका मुलीला नागपूरहून एयर अम्ब्युल्न्सने हैद्राबादच्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. ही मुलगी अवघ्या 25 वर्षांची होती. भारती असं तिचा नाव होत. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून सुद्धा त्या मुलीला वाचवण्यात यश आलं नाही. एका महिन्याच्या लढयानंतर अखेर तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे सोनू खुपचं हताश झाला आहे.

सोनू सूदने ट्वीट करत आपलं दुख व्यक्त केलं आहे. सोनूने म्हटलं आहे, ‘नागपूरची एक तरुण मुलगी भारती, जिला मी एयरलिफ्ट करून एयरअब्म्युल्न्स द्वारे हैद्राबादच्या रुग्नालायात दाखल केलं होतं. कालरात्री तिने अखेरचा श्वास घेतला. ECMO मशीनद्वारे ती गेली एक महिना मृत्यूशी झुंझ देत होती. तिच्या कुटुंबांचा आणि त्या सर्वांचा ज्यांनी भारतीसाठी प्रार्थना केली होती, विचार करून माझं मन जड झालं आहे’.

या मुलीला वाचविण्यासाठी सोनू सूद सतत डॉक्टरांच्या संपर्कात होता. त्या मुलीच्या कुटुंबाला सुद्धा आशा होती की त्यांची मुलगी नक्की ठीक होईल नुकताच सोनू सूद डान्स दिवानेच्या सेटवर सुद्धा उपस्थित होता. त्यावेळी भारतीबद्दल देखील सांगण्यात आलं होतं. भारतीच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी सोनूचे आभार देखील मानले होते. मात्र या प्रयत्नानंतरही तिचं आयुष्य वाचवता नाही आलं.

(हे वाचा:बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक, कोर्टाने जामिनाचा अर्जही फेटाळला   )

या सर्व प्रकाराने सोनू सूद खुपचं दुखी झाला आहे. पाहायला गेलं तर डॉक्टरांनी सुद्धा मुलीला वाचविण्याची 20 टक्केचं खात्री दिली होती. मात्र तरीसुद्धा एयरअम्ब्युल्न्स द्वारे हैद्राबादला आणून, देशातील सर्वात उत्तम डॉक्टरांच्या टीमला भारतीच्या उपचारासाठी नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र दुर्दैवाने तिला वाचविण्यात अपयश आलं.

(हे वाचा: रियाच्या 'रिअल लाईफ हिरो'चा कोरोनाने घेतला बळी, अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला)

कोरोना महामारीमध्ये लोकांच्या मदतीसाठी तत्पर असणारऱ्या सोनूने माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, ‘मी 22 तास फोनवर असतो. आपल्याकडे 40 ते 50 हजार मदतीसाठी आवाहन येत असतात. माझी 10 माणसांची टीम आहे. माझी एक टीम रेमडेसिविर साठी फिरत असते. तर दुसरी टीम बेडच्या शोधात असते’.

First published:

Tags: Bollywood, Marathi entertainment, Sonu Sood