मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

हाताने नाही, तोंडात ब्रश धरुन चिमुरड्याने काढलं सोनू सूद भन्नाट स्केच; एकदा पाहाच VIDEO

हाताने नाही, तोंडात ब्रश धरुन चिमुरड्याने काढलं सोनू सूद भन्नाट स्केच; एकदा पाहाच VIDEO

एका 9 वर्षाच्या दिव्यांग मुलाने सोनू सूदचे (Sonu Sood) चित्र काढले तेदेखील तोंडात ब्रश धरुन. चाहत्याचं प्रेम बघून सोनू सूदही भारावून गेला. एका बघाच या चिमुरड्याने कसं चित्र काढलं आहे.

  मुंबई, 31 डिसेंबर: बॉलिवूड(Bollywood) अभिनेता सोनू सूद(Sonu Sood) लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना मदत करताना दिसून आला होता. या कलावाधीत त्याने मजुरांना आणि गरजू नागरिकांना मदत करत आपल्यामधील हिरोचे दर्शन सगळ्यांना घडवलं होतं. त्याने या कालावधीत अनेक मजूर आणि गरजू व्यक्तींना घरी जाण्यास मदत करण्याबरोबरच आर्थिक मदतदेखील केली होती. त्याच्या या कृतीमुळे सोशल मीडियामध्ये(Social media) त्याचं खूप कौतुक करण्यात आलं. तो आपल्या चाहत्यांना कधीही नाराज करत नाही. त्याचा आणखी एक छोटा चाहता प्रकाशझोतात आला आहे. सोनू सूदने (Sonu Sood) स्वतः या चाहत्याचा एक व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील दिव्यांग (Handicap Child) मुलगा तोंडात ब्रश धरून सोनू सुदचे चित्र पेंट करताना दिसून येत आहे. सोनू सूदने (Sonu Sood) आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हा मुलगा तोंडात ब्रश धरून त्याचे चित्र काढताना दिसून येत आहे. या व्हिडिओला त्याने कॅप्शन देखील दिलं असून  मनाला भिडणारे हे दृश्य असून लवकरच  भेट होईल असे लिहिलं आहे. त्यामुळं हा फोटो पाहून त्याच्या देखील भावना अनावर झाल्याचं आपल्याला या पोस्टमधून दिसून येत आहे.  या 9 वर्षीय मुलाचे नाव असून मधू कुमार असे आहे. एका अपघातात त्याला आपले हात आणि पाय गमवावे लागले होते. परंतु त्याने जिद्द न सोडताना तोंडामध्ये ब्रश धरत सोनू सुदचे हे चित्र काढले आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

  दरम्यान, सोनू सूदने (Sonu Sood) हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण यावर प्रतिक्रिया देत असून या मुलाचे कौतुक देखील करत आहेत. सोनू सूदच्या या भावनिक पोस्टमुळे त्याचे चाहते त्याचे देखील कौतुक करत आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात त्याने केलेल्या समाजसेवेमुळे अजूनही नागरिक त्याचे अभिनंदन आणि आभार मानत आहेत. सोनू सूद (Sonu Sood) आपल्या अनेक चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देखील देत असतो. असेच काही दिवसांपूर्वी त्याने सिमकार्डवर आपला फोटो काढणाऱ्या मुलाचे आभार  मानत फोटोदेखील शेअर केला होता.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood, Sonu Sood

  पुढील बातम्या