• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 21व्या वर्षीच केलं होतं लग्न; अशी होती सोनू सूदची LOVE STORY

21व्या वर्षीच केलं होतं लग्न; अशी होती सोनू सूदची LOVE STORY

30 जुलै1973 ला मोगा (पंजाब) याठिकाणी सोनालीचा जन्म झाला आहे. या दोघांनी प्रेमविवाह केला होता. सोनूच्या पत्नीला माध्यमांपासून दूर राहणं पसंत आहे. त्यामुळे ती कोणत्याच पार्टी किंवा कार्यक्रमांमध्ये दिसून येत नाही.

 • Share this:
  मुंबई, 26 एप्रिल-  कोरोनाच्या (Coronavirus)  काळामध्ये अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)  हा अनेक गरजूंसाठी देव बनला आहे. एक अभिनेता म्हणून तो उत्तम आहेच मात्र एक माणूस म्हणून सुद्धा किती श्रेष्ठ आहे. याची प्रचीती सर्वांना आली आहे. या कोरोना महामारीमध्ये (Corona Pandemic) सोनूने अनेक प्रकारे लोकांची मदत केली आहे. नुकताच त्याला कोरोनाची लागण सुद्धा झाली होती. मात्र या काळातसुद्धा त्यानं आपलं मदत कार्य सुरूचं ठेवलं होतं. सोनूने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. अशा या गुणी कलाकाराच्या चित्रपट करीयर बद्दल तर आपण सर्वचं लोक जाणतो. मात्र सोनूच्या खाजगी आयुष्याबद्दल म्हणजेच त्याच्या पत्नी (Sonu's Wife) आणि मुलांबद्दल खुपचं कमी लोकांना माहिती आहे. आज आपण त्याच्या पत्नीबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. अवघ्या 21 वर्षात केलं होतं लग्नं- सोनूच्या पत्नीचं नाव सोनाली असं आहे. सोनू त्याला प्रेमाने सोनूचं म्हणतो. 30 जुलै1973 ला मोगा (पंजाब) याठिकाणी तिचा जन्म झाला आहे. या दोघांनी प्रेमविवाह केला होता. सोनूच्या पत्नीला माध्यमांपासून दूर राहणं पसंत आहे. त्यामुळे ती कोणत्याच पार्टी किंवा कार्यक्रमांमध्ये दिसून येत नाही.
  View this post on Instagram

  A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

  इंजिनिअरींगच्या शिक्षणावेळी जुळलं सूत-   अभिनेता सोनू सूद आणि पत्नी सोनाली यांची भेट नागपूर मध्ये झाली होती. यावेळी ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते. या दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 25 सप्टेंबर 1996 मध्ये या दोघांनी लग्नं केलं होतं. आता हे दोघे 2 मुलांचे आईवडील सुद्धा आहेत. अयान आणि ईशांत अशी त्यांची नावे आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

  पत्नीवर आहे खुपचं प्रेम- सोनू सोनालीवर आजही तितकचं प्रेम करतो. त्त्याला आपल्या पत्नीवर अभिमान वाटतो. एका मुलाखती दरम्यानसोनूनं म्हटलं होतं की, सोनाली एक खुपचं समजूतदार मुलगी आहे. मी जेव्हा पहिल्यांदा तिला अभिनेता होण्याबद्दल सांगितलं होतं, तेव्हा ती खुश नव्हती मात्र आज तिला माझ्यावर अभिमान वाटतो. (हे वाचा: सलमान खाननं 5 हजार लोकांना केलं अन्न वाटप; युवा सेनेनं मानले भाईजानचे आभार) दोन बहिणींचा लाडका भाऊ- सोनूला दोन बहीणी आहेत. मोनिका आणि मालविका अशी त्यांची नावे आहेत. एकीचं लग्नं पंजाबमध्ये झालं आहे. तर दुसरी परदेशात स्थायिक आहे. 2010 मध्ये सोनूच्या आईचं निधन झालं होतं. तर 8 वर्षानंतर म्हणजेच 2018 मध्ये वडील शक्ती सूद यांचं सुद्धा निधन झालं आहे. (हे वाचा:रणवीर सिंगसुद्धा आहे कास्टिंग काऊचचा बळी; सांगितला धक्कादायक अनुभव  ) वाढदिवस साजरा नाही करत सोनू- सोनू सूद आपला वाढदिवस साजरा नाही करत. यामध्ये सुद्धा भावनिक कारण आहे. सोनूने सांगितलं की जेव्हा त्याच्या आईचं निधन झालं, तेव्हापासून त्यानं वाढदिवस साजरा करणं बंद केलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published: