मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तरुणीनं सोनू सूदकडे मागितला बॉयफ्रेंड; काही वेळातच अशी पूर्ण झाली इच्छा

तरुणीनं सोनू सूदकडे मागितला बॉयफ्रेंड; काही वेळातच अशी पूर्ण झाली इच्छा

एका मुलीने सोनूला ट्वीट(Tweet)  करत ‘बॉयफ्रेंड’ (Demand of Boyfriend) मिळवून देण्याचं आवाहन केलं होतं.

एका मुलीने सोनूला ट्वीट(Tweet) करत ‘बॉयफ्रेंड’ (Demand of Boyfriend) मिळवून देण्याचं आवाहन केलं होतं.

एका मुलीने सोनूला ट्वीट(Tweet) करत ‘बॉयफ्रेंड’ (Demand of Boyfriend) मिळवून देण्याचं आवाहन केलं होतं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 21 मे-  अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)  सध्या अनेकांसाठी देवमाणूस बनला. या कोरोना काळात (Corona Pandemic) आर्थिक मदतीपासून ते ऑक्सिजन, बेडपर्यंत सर्व प्रकारची मदत सोनू सूद करत आहे. मात्र सोनूच्या या मदतीने सर्वचं हैराण झाले आहेत. एका मुलीने सोनूला ट्वीट (Tweet)  करत ‘बॉयफ्रेंड’ (Demand of Boyfriend) मिळवून देण्याचं आवाहन केलं होतं. आणि काही वेळातचं तिची ही इच्छा पूर्ण देखील झाली पाहूया काय आह हा भन्नाट किस्सा.

अभिनेता सोनू सूदने नुकताच एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये त्यानं लिहलं होतं, ‘जमीन से जुडा हुं दोस्त, नीचे खिंचोगे,तो जमीनपर ही मिलुंगा. अशा आशयाची ही पोस्ट होती. काही वेळाने एका मुलीने कमेंट करत सोनूकडे एक विचित्र मागणी केली होती. मुलीने सोनूकडे एक बॉयफ्रेंड मिळवून दे असं चक्क आवाहनचं केल होतं.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनूने यावर कोणतीचं कमेंटही केली नव्हती. मात्र काही वेळा नंतर एका मुलाचा रिप्लाय आला. हो मॅडम, मला सोनू सरांनीच पाठवलं आहे. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. की सोनूने मुलीला चक्क बॉयफ्रेंड शोधून देण्यासाठीही मदत केली. सध्या या कमेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहेत.

(हे वाचा:अभिनेत्रीला वाटत होती लग्नापूर्वीच गरोदर होण्याची भीती; केला धक्कादायक खुलासा  )

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. त्यामुळे लोक हादरून गेले आहेत. या संकटाच्या काळामध्ये अभिनेता सोनू सूद देवासारखा प्रत्येकांच्या मदतीला धावत आहे. सोनू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. त्याला सोशल मीडियाद्वारे मदतीसाठी मेसेज येतं असतात. आणि या सर्वांना सोनू ट्वीट करून मदतीचं आश्वासनही देतो, आणि हे आश्वासन अमलात देखील आणतो. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सोनू सूदचीच चर्चा आहे. या मुलीच्या कमेंटमुळे सोनू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

First published:

Tags: Bollywood, Sonu Sood, Tweet, Twitter