मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shershaah: सिद्धार्थ कसा बनला कॅप्टन विक्रम बत्रा; जाणून घ्या संपूर्ण किस्सा

Shershaah: सिद्धार्थ कसा बनला कॅप्टन विक्रम बत्रा; जाणून घ्या संपूर्ण किस्सा

कॅप्टन विक्रम बत्रा हे वयाच्या 25व्या वर्षी कारगिलच्या युद्धात शहिद झाले होते.

कॅप्टन विक्रम बत्रा हे वयाच्या 25व्या वर्षी कारगिलच्या युद्धात शहिद झाले होते.

कॅप्टन विक्रम बत्रा हे वयाच्या 25व्या वर्षी कारगिलच्या युद्धात शहिद झाले होते.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 15 ऑगस्ट- सध्या ‘शेरशाह’ (Shershaah) चित्रपट सर्वांची मनं जिंकत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा आडवाणीच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतं आहे. इतकचं नव्हे तर 'शेरशाह'ला सिद्धार्थच्या करियरमधील सर्वात जबरदस्त चित्रपटदेखील म्हटलं जातं आहे. कारगिलच्या युद्धात शहिद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रांच्या(Capten Vikram Batra) सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. कॅप्टन विक्रम बत्रा हे वयाच्या 25व्या वर्षी कारगिलच्या युद्धात शहिद झाले होते. सिद्धार्थ मल्होत्राने या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असं म्हटलं जातं आहे. मात्र ही भूमिका सिद्धार्थला कशी मिळाली? हे जाणून घेण्यासाठी सर्वच लोक उत्सुक आहेत.तर पाहूया की या चित्रपटात सिद्धार्थची वर्णी कशी लागली.
सिद्धार्थ मल्होत्राने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे, ‘सुरुवातीला चित्रपटाचे निर्माता शब्बीर बॉक्सवाला यांनी कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी कॅप्टन विक्रम बत्रांच्या कुटुंबाला सांगितलं, की आम्ही तुमच्या मुलावर चित्रपट करू इच्छितो’. तेव्हा त्यांना समजलं की विक्रम यांचे वडील आणि त्यांचा जुळा भाऊ यांची फक्त दोनचं स्वप्न होती. पहिलं म्हणजे विक्रम यांच्यावर एखादं पुस्तक लिहावं आणि दुसरं की त्यांच्या आयुष्यावर एखादा चित्रपटा तयार व्हावा’. (हे वाचा: विलासराव देशमुखांच्या स्मृतिदिनी रितेशने व्यक्त केली खंत; तो Photo शेअर करत..) ‘पुस्तक तर आधीच लिहिलं गेलं होतं. चित्रपट राहून गेला होता. शब्बीर बॉक्सवाला यांच्या या भेटीनंतर या चित्रपट निर्मितीला वेग आला. त्यानंतर विक्रम बत्रा यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरु झाला. दरम्यान मेकर्सचं माझ्याशी बोलणं झालं. त्यांना मी एका पंजाबी मुलासारखा वाटत होतो. तसेच माझ्यामध्ये आणि विक्रम बत्रामध्ये त्यांना अनेक समानता दिसून आल्या. त्यानंतर पुढ बोलणं सुरु झालं’. (हे वाचा:Dance Deewane :...अन् माधुरीसमोर मीराबाई झाली भावुक, स्टेजवरच रडू लागली  ) सिद्धार्थ पुढे म्हणतो, ‘हा चित्रपट सुरुवातीला एका वेगळ्या प्रोडक्शनसोबत तयार करण्यात येणार होता. मी धर्मा प्रोडक्शनच्या जवळ होतो. त्यामुळे मी ही कथा करण जोहरजवळ घेऊन गेलो. त्यांना ही कथा खूपच पसंत पडली. तसेच दिग्दर्शकाची गरज होती. यादरम्यान विष्णू वर्धन आम्हाला दिग्दर्शक म्हणून मिळाले. तसेच पुढे डिंपलचादेखील शोध सुरु होता. त्यावेळी कियारा अडवाणीची वर्णी लागली’. अशाप्रकारे हा चित्रपट प्रत्यक्षात उतरला. आपल्याला सांगू इच्छितो की, कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्कार देण्यात आला आहे.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment

पुढील बातम्या