• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • Shakti Kapoor B'Day Spl: ...म्हणून सुनील सिंकदरलाल कपूर बनले शक्ति कपूर, या हिरोच्या गाडीला धडकल्यानंतर पालटलं होतं नशीब

Shakti Kapoor B'Day Spl: ...म्हणून सुनील सिंकदरलाल कपूर बनले शक्ति कपूर, या हिरोच्या गाडीला धडकल्यानंतर पालटलं होतं नशीब

बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांचा आज वाढदिवस आहे. शक्ती कपूर यांचं खरं नाव सुनील सिंकदरलाल कपूर आहे. जाणून घ्या त्यांच्या आयुष्याती काही रंजक किस्से

  • Share this:
मुंबई, 03 सप्टेंबर: बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor Birthday) यांचा आज वाढदिवस आहे. शक्ती कपूर यांचं खरं नाव सुनील सिंकदरलाल कपूर आहे. नवी दिल्ली येथील एका पंजाबी कुटुंबात 3 सप्टेंबर 1958 या दिवशी शक्ती कपूर यांचा जन्म झाला. दिल्ली येथील कॅनॉट प्लेस येथे शक्ती कपूर यांच्या वडिलांचे टेलरिंगचे दुकान होते. 1975 मध्ये आपल्या करियरला सुरुवात करणाऱ्या शक्ती कपूर यांनी 700 हून अधिक चित्रपटांमध्ये (Bollywood movies) काम केले असून ते आजही या क्षेत्रात कार्यरत आहेत. शक्ति कपूर यांनी नाव का बदलले? शक्ती कपूर यांनी स्वतःचे नाव बदलण्यामागे एक कारण आहे. जेव्हा संजय दत्त (Sanjay Dutt) प्रमुख भूमिकेत असलेल्या रॉकी या चित्रपटासाठी सुनील दत्त (Sunil Dutt) यांनी शक्ती कपूर यांना खलनायकाची भूमिका ऑफर केली होती, त्यावेळी शक्ती कपूर यांना स्वतःचे नाव खलनायकाप्रमाणे वाटले नाही आणि त्यांनी स्वतःचे नाव बदलून शक्ती कपूर केले. आजही शक्ती कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायकांमधील एक म्हणून ओळखले जातात. हे वाचा-Sidharth Shukla Death: शेहनाझच्या हातावर सिद्धार्थनं सोडला जीव? पाहा काय घडलं हो कार अपघाताने मिळाली करियरला कलाटणी ‘क्राईम मास्टर गोगो’ म्हणून ओळखले जाणारे शक्ती कपूर यांनी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये आपल्या बॉलिवूड करिअरच्या सुरुवातीचा एक किस्सा सांगितला होता. आपल्या बॉलिवूड करिअरविषयी बोलताना शक्ती कपूर यांनी सांगितले होते, एकदा त्यांची गाडी दिग्गज अभिनेते फिरोज खान यांच्या गाडीला जाऊन धडकली होती. या अपघाताने त्यांच्या करिअरला चांगलीच कलाटणी मिळाली. जेव्हा शक्ती कपूर हे स्वतःच्या कारमधून बाहेर आले, तेव्हा त्यांनी मर्सडिझमधून एका उंच आणि सुंदर व्यक्तीला उतरताना पाहिले. ती व्यक्ती होती अभिनेते फिरोज खान. शक्ती कपूर यांनी या संधीचा फायदा घेतला, त्यांनी फिरोज खान यांना सांगितले की, पुण्यातल्या 'फिल्म इन्स्टिट्यूट' मधून त्यांनी अभिनयाचा डिप्लोमा केला आहे. हे वाचा-आईची ड्युटी निभावत मलायका अरोरा कशी राहते फीट; अभिनेत्री दिल्या खास टीप्स असे मिळाले काम शक्ती कपूर म्हणाले, ‘फिरोज खान यांच्यासोबत गप्पा मारत असताना चित्रपटामध्ये एका भूमिकेसाठी काम देण्याची त्यांना विनंती केली होती. त्यानंतर फिरोज निघून गेले. त्यानंतर शक्ती कपूर हे त्यांचा मित्र के. के. शुक्ला यांच्या घरी गेले. शुक्ला हे फिरोज खान यांच्यासोबत ‘कुर्बानी’ चित्रपटासाठी काम करीत होते. शक्ती कपूर यांनी फिरोज खान यांना फोन लावला, व कपूर यांना ‘कुर्बानी’ चित्रपटात विक्रमची भूमिका मिळाली.
First published: