Home /News /entertainment /

महागड्या कार, कोट्यावधींचे फ्लॅट्स पाहा शाहिद कपूरकडे आहे किती संपत्ती

महागड्या कार, कोट्यावधींचे फ्लॅट्स पाहा शाहिद कपूरकडे आहे किती संपत्ती

बॉलिवूडमध्ये ( Bollywood) वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे शाहिद कपूर (Shahid Kapoor). शाहिदने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले. या चित्रपट विश्वात येण्यासाठी त्याला खूप संघर्ष (struggle) करावा लागला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26 नोव्हेंबर-  बॉलिवूडमध्ये  ( Bollywood)  वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे शाहिद कपूर (Shahid Kapoor). शाहिदने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले. या चित्रपट विश्वात येण्यासाठी त्याला खूप संघर्ष (struggle) करावा लागला आहे. विविध मुलाखतींमध्ये ( various interviews) शाहिदने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. आज तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. आज शाहिद कपूरची संपत्ती नेमकी किती आहे? 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
  सध्या शाहिद कपूर त्याच्या आगामी 'जर्सी' ( Jersey) चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहिदच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याचं कारण म्हणजे या चित्रपटात तो त्याचे वडील पंकज कपूर यांच्यासोबत दिसणार आहे. गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित या चित्रपटात शाहिद एका अपयशी क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. 2019 मध्ये 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक 'कबीर सिंग'च्या यशानंतर चाहत्यांना शाहिद कपूर भूमिका करत असलेल्या या नव्या चित्रपटाकडूनही खूप आशा आहेत. शाहिद गेल्या 20 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक भाग आहे. या काळात त्याने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या कठोर परिश्रमामुळेच तो आज आलिशान आयुष्य जगताना दिसतोय. शाहिद कपूरची लाइफस्टाइल कशी आहे, ते जाणून घेऊ या.

  अशी आहे शाहिद कपूरची लाइफस्टाइल-

  - शाहिद कपूरला बाइक्सची खूप आवड आहे. शाहिदकडे 'हार्ले-डेव्हिडसन फॅट बॉय', 'बीएमडब्ल्यू 310आर', 'यामाहा एमटी 01' आणि 'डुकाटी स्क्रॅम्बलर 1100 स्पेशल' यांसारख्या महागड्या बाइक्स आहेत. - शाहिद कपूरला बाइक्ससोबतच लक्झरी कारचीही खूप आवड आहे. त्याच्याकडे 'मर्सिडीज', 'जॅग्वार', 'रेंजरोव्हर वोग', 'मर्सिडीज एमएल-क्लास' आणि 'पोर्शे केयेन जीटीएस' यांसारख्या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांच्या किंमती काही लाखांपासून कोटींपर्यंत आहेत. (हे वाचा:Bigg Boss 15:पहिल्यांदाच राखी सावंतच्या पतीचा चेहरा आला समोर; Leak झाले PHOTO ) - शाहिद कपूर एक बहुपैलू स्टार आहे. तो डान्ससुद्धा चांगला करतो. अभिनयही चांगला करतो आणि व्यवसायही उत्तम प्रकारे हाताळतो. अभिनेता असण्यासोबतच तो एक बिझनेसमनदेखील आहे. शाहिद स्कल्ट (Skult) नावाच्या फॅशन ब्रँडचा मालक आहे. त्याची वार्षिक उलाढाल सुमारे 250 कोटी रुपये आहे. - शाहिद कपूरने त्याची पत्नी मीरा कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नंट असताना तिला डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भेट दिला होता. 42व्या आणि 43व्या मजल्यावर असलेल्या या फ्लॅटची किंमत अंदाजे 56 कोटी रुपये आहे. शाहिद आणि मीराचं हे दुसरं घर आहे. या जोडप्याचा जुहूमध्ये एक आलिशान बंगलासुद्धा आहे. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा हे बॉलिवूडमधलं क्यूट कपल आहे. हे जोडपं सुखी व आनंदी वैवाहिक जीवनासोबतच एक आलिशान जीवनशैली जगत आहेत.
  First published:

  Tags: Entertainment, Shahid kapoor

  पुढील बातम्या