मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'पद्मावत'नंतर शाहिद कपूर आणखी एका पौराणिक चित्रपटासाठी सज्ज; साकारणार मोठी भूमिका

'पद्मावत'नंतर शाहिद कपूर आणखी एका पौराणिक चित्रपटासाठी सज्ज; साकारणार मोठी भूमिका

‘पद्मावत’ नंतर शाहिद कपूरला (shahid kapoor) परत एकदा पौराणिक चित्रपटात बघणं औत्सुक्याच ठरणार आहे.

‘पद्मावत’ नंतर शाहिद कपूरला (shahid kapoor) परत एकदा पौराणिक चित्रपटात बघणं औत्सुक्याच ठरणार आहे.

‘पद्मावत’ नंतर शाहिद कपूरला (shahid kapoor) परत एकदा पौराणिक चित्रपटात बघणं औत्सुक्याच ठरणार आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 20 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता (bollywood actor) शाहिद कपूर (shahid kapoor) आपल्या रोमँटिक अंदाजासाठी (romantic films) ओळखला जातो. अभिनेत्यासोबतच एक उत्तम डान्सरसुद्धा (dancer) आहे. शाहिद सोशल मीडियावरसुद्धा (active on social media) मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतो. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून तो सतत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. शाहिद सध्या आपल्या ‘जर्सी’ (jersey) या चित्रपटासाठी बराच चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. यामध्ये शाहिद एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहिद आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी मोठी मेहनत घेतो.

‘पद्मावत’ (padmavat) मधील रतनसिंग (ratansingh)आणि कबीर सिंगमधील (kabir singh) कबीर (kabir) या भूमिका चाहत्यांच्या मोठ्या पसंतीस उतरल्या होत्या. आता नवीन मिळालेल्या माहितीनुसार शाहिद एका पौराणिक चित्रपटात दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

पिंकविलामध्ये आलेल्या अहवालानुसार, महाभारतातील योद्धा ‘कर्ण’वर आधारित तयार होणाऱ्या चित्रपटात शाहिद दिसणार असल्याचं सांगितलं आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाचं शूटिंग सुरू होऊ शकतं, असंदेखील म्हटलं जातं आहे.

हे वाचा - बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी काय करावं? रणवीर सिंगनं दिला कानमंत्र

शाहिद सध्या राज नीदिमेरू आणि कृष्णा डी यांच्या एका वेबसीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हे शूटिंग गोव्यामध्ये होतं आहे. आता तो दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या चित्रपटात काम करणार आहे. हा चित्रपट महाभारतातील योद्धा ‘कर्ण’च्या आयुष्यावर आधारित असणार आहे. याची निर्मिती रोनित स्क्रूवाला करणार आहे.

हे वाचा -  अमिताभ बच्चन यांनी बाबिलला दिल्या बॉलिवूड पदार्पणासाठी शुभेच्छा; म्हणाले...

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जेव्हा परत शूटिंग सुरू झालं होतं. तेव्हा शाहिदनेही आपल्या ‘जर्सी’ चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं होतं. शाहिदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. त्यात तो क्रिकेटच्या मैदानावर दिसून येत होता. रोमँटिक अभिनेता म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या शाहिद कपूरला ‘पद्मावत’ नंतर परत एकदा पौराणिक चित्रपटात बघणं औत्सुक्याच ठरणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Marathi entertainment, Shahid kapoor