मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

भर पावसात सलमान खान करतोय ‘हे’ काम, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

भर पावसात सलमान खान करतोय ‘हे’ काम, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

एकीकडे कोरोनाच्या काळात सलमान खान आपल्या घरीच वेळ घालवत आहे, तर दुसरीकडे स्वत: ला व्यस्त ठेवण्यासाठी त्यानं एक अनोखा मार्ग निवडला आहे.

  मुंबई, 20 जुलै: बॉलिवूडचा दबंग (Salman Khan) आजकाल एका वेगळ्या अवतारात दिसत आहे. एकीकडे कोरोनाच्या काळात सलमान खान आपल्या घरीच वेळ घालवत आहे, तर दुसरीकडे स्वत: ला व्यस्त ठेवण्यासाठी त्यानं एक अनोखा मार्ग निवडला आहे. सलमान खान सध्या मेहनत करून शेती (Farming) करताना दिसत आहे. अलीकडेच त्याने सोशल मीडिया अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले होते, यात तो शेती करताना दिसत आहे. आता सलमानने पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान ट्रॅक्टरने शेत नांगरताना दिसत आहे. सलमान खानने आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान शेती करताना दिसत आहे. पहिले ट्रॅक्टरच्या मागे नांगर लावून सलमान शेतात नांगरणी करत दिसत आहे. त्यानंतर तो स्वत: ट्रॅक्टरही चालवत आहे. हा व्हिडीओ सलमान खानने 'फार्मिंग', असे कॅप्शन लिहून शेअर केला आहे. वाचा-रुग्णालयात बिग बी वडिलांच्या आठवणीत झाले भावूक; शेअर केली ही कविता
   
  View this post on Instagram
   
  Farminggg

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  वाचा-लॉकडाऊनंतर दीपिका सर्वात आधी करणार हे काम, चाहत्यांना दिली माहिती हाफ पँट घालून सलमान खान सध्या शेती करताना पाहून त्याचे चाहते बरेच खुश आहेत. सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याआधी सलमानने शेअर केलेले फोटोही चर्चेत होते. लसॉकडाऊनपासून सलमान खान पनवेल येथील फार्महाऊसमध्ये आहे. इथं तो शेतीची कामे करत आहे.
  View this post on Instagram

  Respect to all the farmers . .

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  याआधी शेती केल्यानंतर थकलेल्या अवस्थेत, हाता पायाला चिखल लागलेला असा फोटो सलमानने शेअर केला होता. वाचा-रिया चक्रवर्तीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल,दिली होती धमकी
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Salman khan

  पुढील बातम्या