मुंबई, 27 डिसेंबर: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा आज 57 वर्षांचा (Salman Khan Birthday) झाला. या खास दिवशी त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्याच्यावर शुभेच्छांचा (Happy Birthday Salman Khan) वर्षाव करत आहेत. बॉलीवूडमध्ये तब्बल 30 वर्षांपेक्षा अधिक काळ अभिनय करूनही त्याची जादू अजूनही कायम आहे. 57 व्या वर्षीही त्याच्याच नावाने चित्रपट चालतात. कोणताही सिनेमा हिट करण्याची गॅरंटी असते.
27 डिसेंबर 1965 मध्ये मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये सलमानचा जन्म झाला. त्याचा चाहता वर्ग आज जगभरात आहे. प्रसिद्ध चित्रपट लेखक सलीम खान (Salman Khan Father Salim Khan) आणि त्यांची पहिली पत्नी सुशीला चरक उर्फ सलमा यांचा तो मोठा मुलगा आहे. सलमानचं पूर्ण नाव अब्दुल रशीद सलमान खान असं आहे.
View this post on Instagram
‘मैंने प्यार किया’ रातोरात बनवलं सुपरस्टार
सलमान खानने बॉलीवूडमध्ये चित्रपट ‘बीवी हो तो ऐसी’ (Biwi Ho to Aisi) च्या माध्यमातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. या चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली होती. पण त्याला रातोरात सुपरस्टार बनवलं ते निर्माता सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) चित्रपटाने. या रोमँटिक चित्रपटाने त्याकाळी सर्वाधिक कमाई केली होती. या चित्रपटासाठी सलमानला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
सलमानचे प्रमुख चित्रपट
‘मैंने प्यार किया’, ‘सनम बेवफा’, ‘साजन’, ‘हम आपके हैं कौन’, ‘करण अर्जुन’, ‘जुडवां’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘बीवी नंबर वन’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘नो एंट्री’, ‘पार्टनर’, ‘वाँटेड’, ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ ‘दबंग2’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘रेस’, राधे, ‘अंतिम’.
कोट्यवधी संपत्तीचा आहे मालक
सलमान खानने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याची पहिली कमाई फक्त 75 रुपये होती. पण आज सलमान कोटींमध्ये कमवत आहे. भारतातील अनेक शहरात त्याच्या नावे संपत्ती आहे. एवढंच नाहीतर बीइंग ह्युमन (Being Human) नावाचा त्याच्या स्वतःचा ब्रँडही आहे. जो खूपच प्रसिद्ध आहे.
View this post on Instagram
खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत
सलमान खान हा नेहमीच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. मग ते एखाद्या अभिनेत्रीशी जोडलेलं नाव असो, हिट अँड रन केस असो वा काळ्या हरिणाच्या शिकारीचा खटला असो. ज्यामुळे त्याला तुरूंगाची हवाही खावी लागली होती. पण त्याच्या प्रसिद्धीमध्ये घट झालेली नाही. कारण सलमानचे चाहते नेहमीच त्याला चांगल्या मनाचा माणूस मानतात. जो गरजूंच्या मदतीला नेहमी तत्पर असतो. सलमान खान वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Salman khan