कतरिना कैफचा रावडी अवतार; सलमानचा गळा पकडत म्हणाली...

कतरिना कैफचा रावडी अवतार; सलमानचा गळा पकडत म्हणाली...

सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफची (Katrina Kaif) ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त आहे. पण एक था टायगरच्या (Ek Tha Tiger) सेटवर असं काय घडलं की कॅटरिनाने सलमानचा गळाच धरला

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि सलमान खानची (Salman Khan) जोडी ऑनस्क्रीन हीट आहे. त्यांनी एकत्र काम केलेले चित्रपट नेहमीच गाजतात. सलमान आणि कतरिना ऑनस्क्रीन अतिशय छान दिसतात. कारण त्यांच्या तेवढीच छान केमिस्ट्री आहे. सेटवर काम करताना फावल्या वेळात ते एकमेकांसोबत खूप मस्ती करत असतात. एकेकाळी सलमान आणि कतरिनाच्या अफेअरच्या चर्चाही फार रंगल्या होत्या. पण ते दोघंही वेगळे झाले असून अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण ‘एक था टायगर ’ सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी असं काही घडलं की कतरिनाने सलमानचा गळाच पकडला. 2012 मधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच हिट होत आहे.

सलमानने केली मस्करी

‘टायगर जिंदा हैं’ सिनेमातील मशअल्लाह गाण्याचं शूटिंग करताना सलमानने कतरिनाची मस्करी केली. गाण्याचं शूटिंग चालू असताना सलमान आणि कतरिनाचा क्लोज शॉट घेण्यात येणार होता. ज्यात त्या दोघांचा फक्त चेहराच दिसणार होता. पण कतरिनाला हे लक्षात आलं नाही. ती मस्तपैकी ठुमके लगावताना दिसत आहे. त्यावरुन सलमानने तिची मस्करी केली. त्याचा कतरिनाला राग आला आणि तिने त्याचा गळाच पकडला. हा व्हिडीओ यशराज फिल्मद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडीओला सल्लूमियाँच्या चाहत्यांची पसंती मिळत आहे. सलमानसोबत नेटकरीही कतरिनाची मस्करी करत आहेत.

कतरिना – सलमान पुन्हा एकत्र दिसणार?

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, कतरिना कैफ आणि सलमान खान यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकण्याची शक्यता आहे. कारण टायगर3 (Tiger 3)चं सध्या प्लॅनिंग सुरू आहे. या फिल्ममध्ये शाहरुख खानही दिसण्याची शक्यता आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 27, 2020, 5:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading