Home /News /entertainment /

सर्वात महागडा सिनेमा असणार सलमानचा Tiger-3, बिग बजेट फिल्मसाठी चाहते उत्सुक

सर्वात महागडा सिनेमा असणार सलमानचा Tiger-3, बिग बजेट फिल्मसाठी चाहते उत्सुक

अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) आणि अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर सिरीजमधील 'टायगर-3' (Tiger 3) हा सिनेमा बंपर बजेटमध्ये बनणार आहे.

    मुंबई, 11 सप्टेंबर : अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) आणि अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) यांच्या  टायगर सिरीजमधील 'टायगर-3' (Tiger 3) हा सिनेमा  बंपर बजेटमध्ये बनणार आहे. बॉलीवूड मधील सर्वात जास्त बजेटचा हा चित्रपट असणार आहे. बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचे जगभरामध्ये खूप फॅन आहेत. त्याच्या चित्रपटाची अनेकजण वाट पाहत असतात. टायगर सिरीज त्याच्या चाहत्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. सलमान खान आणि कतरीना यांचा  ' एक था टायगर ' आणि ' टायगर जिंदा है ' या सिनेमाच्या लोकप्रियतेनंतर आता याच्या तिसऱ्या  भागाची लोक खुप आतुरतेने बघत आहेत. या तिसऱ्या भागामध्ये सुद्धा सलमान आणि कतरीना दिसतील अशी अपेक्षा त्याच्या फॅन्सना आहे. पण अशा कोणत्याच प्रकारची घोषणा यशराज फिल्म (Yash Raj Films) कडून करण्यात आलेली नाही. मात्र स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. (हे  वाचा-'तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा' साजिद खानवर मॉडेलचा लैंगिक शोषणाचा आरोप) टायगर- 3 च्या  निर्मितीवर 200 ते 250 करोड रुपयाचा खर्च केला जाणार आहे. आतापर्यंतच्या बॉलीवूड इतिहासातील सगळ्यात मोठी किंमत यासाठी वापरली जाणार आहे. चित्रपटाच्या  प्रिंट आणि पब्लिसिटीवर 20 ते 25 रुपये खर्च केले जाणार आहेत. या अहवालानुसार या सिनेमासाठी सलमान खान 100 करोड इतके मानधन घेणार आहे. त्याचबरोबर सिनेमातून मिळणाऱ्या नफ्यामध्ये देखील त्याचा वाटा असणार आहे.  ही action फिल्म बनवताना आदित्य चोप्रांकडून कोणत्याही प्रकारची कसर सोडली जाणार नाही आहे. एकंदरित सर्व खर्च पाहता या फिल्मसाठी 350 कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा सिनेमा सर्वात महागडा सिनेमा ठरणार आहे. (हे वाचा-OMG! चिरंजीवीचा नवीन लुक पाहिलात का? Bald फोटो पाहून चाहते शॉक) धूमच्या (Dhoom) फ्रेंचाइजी बरोबरच टायगर सिरीज देखील वायआरफ फिल्मसाठी महत्वाची आहे. त्यासाठी सहा ते सात action टीम बरोबर पूर्ण देश-विदेशात शूट करण्यात येणार आहे. या सिनेमासाठी गेली दोन वर्ष आदित्य चोप्पा आणि त्याची टीम लेखन करत आहे. आतापर्यंतचा सर्वात बेस्ट हा सिनेमा असणार आहे, असा विश्वास या टीमकडून व्यक्त करण्यात येत आहे. 2017 साली आलेला 'टायगर जिंदा है ' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या सिनेमाने 400 कोटींचा व्यवसाय केला होता. भारतात या सिनेमाने  339.96 कोटींची कमाई केली होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Katrina kaif, Salman khan

    पुढील बातम्या