सलमानच्या घरी होणार होती लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी, पण कोरोनामुळे झाला रंगाचा बेरंग

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मनोरंजन विश्वात विविध कार्यक्रमांचे, सिनेमांचे शूटिंग सुरू झाले आहे. असे असले तरी कोरोनाचा धोका कायम आहे. आता भाईजान सलमान खानच्या घरापर्यंत देखील कोरोना (Coronavirus) पोहोचला आहे.

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मनोरंजन विश्वात विविध कार्यक्रमांचे, सिनेमांचे शूटिंग सुरू झाले आहे. असे असले तरी कोरोनाचा धोका कायम आहे. आता भाईजान सलमान खानच्या घरापर्यंत देखील कोरोना (Coronavirus) पोहोचला आहे.

  • Share this:
    मुंबई, 19 नोव्हेंबर: कोरोना (Coronavirus) आता बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan)च्या घरापर्यंत पोहोचला आहे. घरातील स्टाफमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सलमान खान आता होम क्वारंटाइन असणार आहे. सलनाच्या ड्रायव्हरसह 2 जणं कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. सलमान आणि त्याचे कुटुंबीय आता आयसोलेट झाल्यामुळे अभिनेत्याचे आई-वडील सलीम खान आणि सलमा खान यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम देखील होणार नाही आहे. पिंकव्हिलाने याबाबत वृत्त दिलं आहे. संक्रमित स्टाफ मेंबर्सना मुंबईतील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. मात्र अद्याप खान कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट समोर आले नाही आहे. अभिनेता सलमान खान बिग बॉस-14 (Bigg Boss) हा शो होस्ट करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या एपिसोडमध्ये सलमान दिसणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याचप्रमाणे सलमानचा अपकमिंग सिनेमा 'राधे' याचं शूटिंग देखील सुरू झालं आहे. या सिनेमात सलमान खानबरोबर अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) स्क्रीन शेअर करत आहे. (हे वाचा-सुशांत प्रकरणात फेक न्यूजचा सुळसुळाट! युट्यूबरने कमावले लाखो, FIR दाखल) गेल्या एक-दोन महिन्यांपासून बॉलिवूड कलाकारांची कामं पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. सर्वांनी 'New Normal' स्विकारत चित्रपट, मालिका, टेलिव्हिजन कार्यक्रमांचं शूटिंग सुरू केलं आहे. कोरोना लॉकडाऊन (Lockdown) काळात थांबलेली कामं पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. मात्र असे असले तरीही कोरोनाची भीती अद्यापही कायम आहे. या कलाकारांचा दिवसभरात विविध लोकांशी संपर्क येत असल्याने ही भीती आहे. (हे वाचा-मिलिंद सोमणनंतर आता ही अभिनेत्री चर्चेत, TOPLESS PHOTO सोशल मीडियावर व्हायरल) केवळ मनोरंजन विश्वच नाही तर कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आहे. महाराष्ट्रात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा 17 लाखांहून अधिक आहे. महाराष्ट्रात 17 लाख 57 हजार पेक्षा अधिक केसेस आहेत आणि 46 हजार 200 हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 80 हजार 221 अॅक्टिव्ह केसेस आहेत तर 16 लाख 30 हजार 111 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. मुंबईमध्ये कोरोनाचे 2 लाख 71 हजार 500 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत, दरम्यान 10 हजार 615 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीमध्ये कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: