मुंबई, 28 एप्रिल- बॉलीवूड अभिनेता (Bollywood Actor) सलमान खानच्या (Salman Khan) ‘राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई’(Radhe: Your Most Wanted Bhai) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला होता. रिलीजनंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु होती. ती म्हणजे सलमान खान आणि अभिनेत्री दिशा पाटनीच्या लीप लॉकची(Salman Khan And Disha Patani Kiss). प्रोमोच्या एका फोटोमध्ये सलमान आणि दिशा किस करताना दिसत आहेत. त्यावरूनच हा सर्व गोंधळ सुरु झाला होता. या सीनमुळे सलमान खानने आपली ‘नो किस पॉलिसी’ स्वतःचं तोडल्याचं म्हटलं जातं होतं.
मात्र सलमान खानच्या हालचालींवर घारी सारखी नजर ठेऊन असणाऱ्या चाहत्यांनी शेवटी शोधून काढलंचं या चर्चेमागील सत्य. सध्या मिळालेल्या माहितीवरून सलमानने आपली ‘नो किस पॉलिसी’ तोडली नसल्याचं म्हटलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान खान आणि दिशा पाटनीचा एक स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. यामध्ये सलमानच्या चाहत्यांनी दावा केला आहे. की लीप लॉकच्या सीनमध्ये दिशाच्या तोंडावर ‘चिकट टेप’ आहे. त्यामुळे सलमानची नो किस पॉलिसी अबाधित आहे.
View this post on Instagram
ट्रेलरला लक्षपूर्वक पाहिलं तर कळून येतं की दिशाच्या तोंडावर चिकट टेप आहे. ज्याला त्याच्या चाहत्यांनी शोधून काढलं आहे. या फोटोंवर युजर्स कडून निरनिराळ्या कमेंट्स येत आहेत. मात्र सलमानने नो किस पॉलिसी तोडली आहे की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरचं समजेल.
(हे वाचा: लॉकडाऊनचे नियम मोडणं पडलं भारी; बॉलिवूड अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक)
माहितीप्रमाणे सलमान खानने एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं, की ‘किस’ कोणत्याही चित्रपटासाठी आवश्यक नाहीय. आणि त्याला या सीनसाठी अस्वस्थ वाटतं. मात्र सध्या सलमान आपले रुल्स बदलताना दिसून येत आहे. राधेच्या ट्रेलरमध्ये सलमान पहिल्यांदा आपल्या सह-अभिनेत्रीला किस करताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.