Home /News /entertainment /

रेस्टॉरंटमधून बाहेर पडताच सैफ अली खानच्या मुलाला लोकांनी घेरलं अन्.... पुढे जे घडलं, पाहा VIDEO

रेस्टॉरंटमधून बाहेर पडताच सैफ अली खानच्या मुलाला लोकांनी घेरलं अन्.... पुढे जे घडलं, पाहा VIDEO

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या अनेक स्टारकिड्स (Starkids) चर्चेत असतात. ते सतत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने कॅमेऱ्यात कैद होत असतात. अलीकडे सोशल मीडियावर कलाकारांपेक्षा या स्टारकिड्सचीच चलती आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अभिनेता सैफ अली खानचा मुलगा (Saif Ali Khan Son) इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) हा पापाराझींचा आवडता स्टारकिड आहे असंच म्हणावं लागेल. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच त्याची मोठी फॅन फॉलोइंग निर्माण झाली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 17 मे- बॉलिवूडमध्ये   (Bollywood)  सध्या अनेक स्टारकिड्स   (Starkids)   चर्चेत असतात. ते सतत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने कॅमेऱ्यात कैद होत असतात. अलीकडे सोशल मीडियावर कलाकारांपेक्षा या स्टारकिड्सचीच चलती आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अभिनेता सैफ अली खानचा मुलगा   (Saif Ali Khan Son)  इब्राहिम अली खान   (Ibrahim Ali Khan)  हा पापाराझींचा आवडता स्टारकिड आहे असंच म्हणावं लागेल. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच त्याची मोठी फॅन फॉलोइंग निर्माण झाली आहे. तो सतत मुंबईत फिरताना दिसून येतो. या स्टार किडला नुकतंच मुंबईतील वांद्रे येथील एका आलिशान रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पाहण्यात आलं. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इब्राहिम अली खान या रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानादिसून येत आहे. ज्यामध्ये तो चाहत्यांनी घेरलेला दिसत आहे.याठिकाणी इब्राहिमला पाहून प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.त्यामुळे त्याला आपल्या कारपर्यंत पोहोचण्यासाठी फारच प्रयत्न करावे लागत आहेत. शिवाय पापाराझीही त्याचे फोटो काढण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. या सर्व परिस्थितीतही इब्राहिम अली खानने अत्यंत संयम राखलेला दिसत आहे. हा व्हिडिओ स्टार फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'वेगळ्याच लेव्हलचा एक्झिट होता. कारण या घाईत आम्ही आमचा फोनही गमावला.' व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी इब्राहिमच्या संयमाचे कौतुक करत आहेत.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इब्राहिम रेस्टॉरंटच्या बाहेर पडताच चाहत्यांनी त्याला घेरले. त्याच्यासोबत चाहत्यांचीही थोडी बाचाबाची झाली. व्हिडिओमध्ये, इब्राहिम पांढर्‍या डेनिम जीन्ससह काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
  व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सर्व बाजूंनी घेरलेल्या इब्राहिमचा कुणी हात खेचत आहे. तर कुणी शर्ट परंतु हा स्टारकिड अत्यंत शांतपणे त्याच्या कारमध्ये बसला. कामाबाबत बोलायचं झालं तर, इब्राहिम सध्या करण जोहरला त्याच्या पुढील चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी असिस्ट करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. त्याने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही.वास्तविक इब्राहिमला अभिनयात अजाबात रस नाही. त्याला दिग्दर्शनाची आवड आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Saif Ali Khan

  पुढील बातम्या