मुंबई, 03 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील नेपोटिझमवरून चर्चा सुरू झाली. अनेक बॉलावूड सेलिब्रिटींनीदेखील बॉलीवूडमधील नेपोटिझमवरून व्यक्त झाले. अशात आता अभिनेता सैफ अली खानने एका मुलाखतीत आपणही नेपोटिझमचा शिकार झाल्याचं सांगतिलं, यानंतर सैफ नेटिझन्सच्या निशाण्यावर आला आहे. आपल्या या वक्तव्यानंतर सैफ सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला आहे.
अशात दिवंत अभिनेते मंसूर अली पटौदी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा असलेला सैफ स्वत:ला नेपोटिझमचं शिकार म्हणू लागला.
द न्यू इंडियन एक्स्प्रेसला सैफ अली खानने मुलाखत दिली होती. सैफ म्हणाला, नेपोटिझम ही अशी गोष्ट आहे, ज्याचा शिकार मी स्वत: झालो आहे. मी इथं कुणाचा नाव घेणार नाही. मात्र एकदा कुणा एकाच्या वडिलांनी फोन करून सांगितलं होतं की सैफला या फिल्ममध्ये घेऊ नका, फिल्ममध्ये या अभिनेत्याला घ्या. हे असं होतं आणि माझ्यासोबतही झालं आहे.
Iam victim of nepotism #SaifAliKhan pic.twitter.com/6vxw7Wa6Wd
— soulblighterzz (@soulblighterzz) July 2, 2020
#SaifAliKhan - I’m Victim Of #Nepotism.
Me - pic.twitter.com/b9aZiQeEeE
— Anai Komagan (AK) (@AnaiKomagan) July 2, 2020
Saif ali khan calls himself a victim of nepotism#SaifAliKhan pic.twitter.com/8VkCN7yPZ3
— Krishnaholic (@jeena_mansi) July 2, 2020
लोकांना हे फारसं काही पटलं नाही, मग त्यांनी त्याला ट्रोल करणं सुरू केलं. त्याच्या या वक्तव्यानंतर मीम्स व्हायरल होऊ लागलेत. एका युझर्सने लिहिलं, सैफ अली खान : मी नेपोटिझमचा शिकार आहे. ही मस्करी आहे का?. तर एकाने लिहिलं आहे, अभिनंदन सैफ, तूदेखील नुकतीच अनन्या पांडे इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रगलमधून ग्रॅज्युएशन डिग्री घेतली आहे. तर एकानं म्हटलं मला वाटतं की त्यांना नेपोटिझम म्हणजे काय हे माहिती नसावं, कुणीतरी त्यांना त्याचा अर्थ सांगा.
हे वाचा - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी बोलावले?
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला बॉलीवूडमधील नेपोटिझमला जबाबदार धरलं जात आहे. अनेक सेलिब्रिटी यावर व्यक्त झाले. अनेकांनी आपणही नेपोटिझमचं शिकार झाल्याचं सांगितलं. कित्येक बॉलीवूड कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आता सोशल मीडिया युझर्सच्या निशाण्यावर आहेत. यामध्ये करण जोहर, आलिया भट्ट, सलमान खान, सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा यांचा समावेश आहे.
संपादन - प्रिया लाड