मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'...तेव्हा समजून जा तुमचं म्हातारपण आलंय'; रितेशनं जेनेलियासोबत शेअर केला मजेशीर REEL

'...तेव्हा समजून जा तुमचं म्हातारपण आलंय'; रितेशनं जेनेलियासोबत शेअर केला मजेशीर REEL

ritesh deshmukh

ritesh deshmukh

रितेश देशमुखनं जेनेलियासोबतचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही.

  मुंबई, 8 ऑगस्ट : बॉलिवूडचं क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh)आणि जेनेलिया डिसूझा सतत चर्चेत असतात. दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरतात. निरनिराळे व्हिडीओ, फोटो शेअर करत ते चाहत्यांसोबत कनेक्ट राहतात. अशातच रितेश देशमुखनं जेनेलियासोबतचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग पाहुया रितेशनं काय मजेशीर व्हिडीओ बनवलाय. रितेश देशमुखनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर केलं आहे. यामध्ये जेनेलियाही दिसत आहे. रितेशनं एका मजेशीर ऑडियो- क्लिपवर हा व्हिडीओ बनवलाय. 'जेव्हा तुम्हाला तुमच्या बायकोवर प्रेम होईल तेव्हा समजून जा की, तुमचं म्हातारपण आलं आहे', अशा आशयाचा मजेशीर व्हिडीओ रितेशनं बनवला आहे. रितेशहे बोलणं ऐकून जेनेलिया त्याला मारायला येत असल्याचंही पहायला मिळतंय. एकंदरीत रितेशच्या या मजेशीर व्हिडीओनं चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन झाल्याचं दिसतंय.
  View this post on Instagram

  A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)

  रितेशच्या या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येताना दिसत आहे. व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंटही येताना दिसतायेत. रितेशनं यापूर्वीही असे अनेक भन्नाट व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याची ही विनोदी शैली चाहत्यांच्या ओठांवर नेहमीच एक हास्य उमटवत असते. त्याच्या हा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो आणि यावर भन्नाट प्रतिसादही पहायला मिळतात. हेही वाचा -  करीना पेक्षा कमी नाहीय शाहिदच्या पत्नीचा थाट; मीरा राजपूतच्या ड्रेसची किंमत पाहून व्हाल थक्क दरम्यान, रितेश देशमुखने 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पाऊल टाकलं. या सिनेमातील त्याची अभिनेत्री जेनेलियासोबत तो प्रेमात पडला आणि लग्नही केलं. नुकताच 5ऑगस्ट रोजी जेनेलियाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळीही रितेशनं एक कॉमेडी व्हिडीओ शेअर करत बायको जेनेलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actor, Instagram post, Ritesh deshmukh

  पुढील बातम्या