मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: जेनेलियाच्या कानशिलात लगावणाऱ्या अभिनेत्याला रितेश देशमुखने धू-धू-धुतला

VIDEO: जेनेलियाच्या कानशिलात लगावणाऱ्या अभिनेत्याला रितेश देशमुखने धू-धू-धुतला

जेनेलिया डिसूझाने अयाझखानसोबत ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यावेळी अयाझने असं काही केलं होतं की ते अद्याप रितेश काय चाहतेही विसरले नाहीत.

जेनेलिया डिसूझाने अयाझखानसोबत ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यावेळी अयाझने असं काही केलं होतं की ते अद्याप रितेश काय चाहतेही विसरले नाहीत.

जेनेलिया डिसूझाने अयाझखानसोबत ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यावेळी अयाझने असं काही केलं होतं की ते अद्याप रितेश काय चाहतेही विसरले नाहीत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 24 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा (Genelia D'Souza) बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक कपल आहे. ही जोडी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव असते. इन्स्टाग्रामवर तर यांच्या रीलचा बोलबाला आहे. या रीलमधून असेल किंवा खऱ्या आयुष्यात या दोघांचे एकमेंकाविषयचे प्रेम दिसते. दोघांनीही आपल्या करिअरच्या सुरुवातीला भरपूर धमाकेदार चित्रपट दिले आहेत. चित्रपटादरम्यान 13 वर्षांपूर्वी अभिनेता अयाझ खानने जेनेलियासोबत असं काही केलं होत जे रितेश देशमुख आजही विसरलेला नाही आणि आता इतक्या वर्षानंतर त्याने त्याचा बदला घेतला आहे. रितेशने अयाझला (Ayaz Khan)  जेनेलियाच्या कानशिलात लगावल्याने धू-धू-धुतला आहे.

झालं असं की, जेनेलिया डिसूझाने अयाझखानसोबत ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात काम केलं आहे. यातील गाणी लोकप्रिय ठरली होती. त्यासोबत एक सीनदेखील चांगलाच लोकप्रिय ठरला होता.चित्रपटातील एका दृश्यादरम्यान, अदिती (जेनेलिया डिसूझा) हिला तिचा होणारा नवरा सुशांत (अयाझ खान) कानशिलात मारतो. हा चित्रपटाचा एक भाग होता. मात्र आता रितेश देशमुखने 13 वर्षानंतर त्याच्याच शैलीत याचा बदला घेतला आहे. सध्या या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वाचा, HBD: अभिनेत्री बनण्यासाठी मल्लिका शेरावतने सोडलं होतं घर; हे आहे खरं नाव

अयाझ खानने रितेशसोबत त्याचा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या वर, त्याने लिहिलं आहे की.. ‘आणि जेव्हा मला वाटले की द्वेष संपला आहे’. यानंतर, रितेश देशमुख व्हिडीओमध्ये येतो आणि अयाझला मारायला सुरूवात करतो. त्यांची ही हाणामारी फक्त मस्करी आहे. याचा संबंध ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाशी आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayaz Khan (@ayazkhan701)

हा मजेदार व्हिडीओ शेअर करताना अयाझने कॅप्सनमध्ये लिहिलं आहे की ‘ हा द्वेष कधी संपेल का ?’ त्याने रितेश आणि जेनेलियाला हसत इमोजी शेअर करून टॅग केले आहे. रितेशने मात्र मजेत का असेना बायकोचा बदला चांगलाच घेतल्याचे दिसत आहे.

वाचा- VIDEO:'माझं नाव घेऊ नको' अनन्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन जाणारा ईशान खट्टर ट्रोल

अयाझने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी देखील चांगलीच पसंती दिली आहे. मालिकांमधून अयाझने करिअरला सुरुवात केली होती. ‘दिल मिल गये’ या मालिकेतील त्याची भूमिका विशेष गाजली होती. तर ब्लफमास्टर, हनीमून ट्रैवल्स प्राइवेट लिमिटेड, चश्मे बद्दूर या चित्रपटताही त्याने अभिनयाची चमक दाखवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayaz Khan (@ayazkhan701)

यापूर्वी अयाझने एक व्हिडीओ शेअर केला होता आणि तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अयाजने कॅप्शन दिली होती की.. त्या घटनेला 13 वर्षे झाले मात्र आजही द्वेष काही कमी झालेला नाही.. या व्हिडीओमध्ये तो म्हणत आहे की मला आज देखील अदितीच्या कानशिलात मारल्याचे वाईट वाटत आहे. असं मी का केल याचा तो पश्चाताप करताना दिसत आहे. हा व्हिडिओ फनी आहे मात्र आजही प्रेक्षक चित्रपटातील तो सीन विसरू शकलेले नाहीत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Ritesh deshmukh