रितेश देशमुखने हैदराबाद एअरपोर्ट सिक्युरिटीची घेतली शाळा, ट्विटरवर शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

रितेश देशमुखने हैदराबाद एअरपोर्ट सिक्युरिटीची घेतली शाळा, ट्विटरवर शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

रितेशने २७ मे रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हैदराबाद एअरपोर्टचे दोन व्हिडिओ शेअर केले.

  • Share this:

हैदराबाद, 28 मे- सुरत येथे झालेल्या अग्नीतांडवात २२ मुलांचा मृत्यू झाला होता तर अनेक मुलं गंभीर जखमी झाली होती. सूरतमधील या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या दुर्घटनेशी निगडीत अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या घटनेनंतर लोक अशापद्धतीच्या अपघातामधून वाचण्यासाठी सर्तक झालेली दिसत आहेत. सर्वसामान्य माणसंच नाही तर अनेक सेलिब्रिटीही याबाबत जागरूक झालेले दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा अशाच सतर्क नागरिकांपैकी एक आहे.

रितेशने २७ मे रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हैदराबाद एअरपोर्टचे दोन व्हिडिओ शेअर केले. यात एअरपोर्ट लॉन्ज येथील आपतकालीन दरवाजा बंद दिसत आहे. आत आणि बाहेर जाण्यासाठी फक्त एलिवेटरचाच पर्याय उपलब्ध आहे. तसेच तांत्रिक बिघाडामुळे एलिवेटर बंद आहे. रितेशने ट्वीट करत म्हटलं की, तो स्वतः त्यावेळी हैदराबाद एअरपोर्टवर हजर होता.

रितेशने ट्वीट करत म्हटलं की, भलेही प्रवाशांचं फ्लाइट चुकलं तरी चालेल पण सुरक्षा कर्मचारीने दरवाजा उघडला नाही. हैदराबाद विमानतळ प्रशासनाने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, पब्लिक एग्झिटला बंद करता येत नाही. रितेशच्या या ट्वीटनंतर हैदराबाद विमानतळ प्रशासनाने उत्तर देत, प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल खंत व्यक्त केली. तसंच एका तांत्रिक किरकोळ गडबडीमुळे दरवाजा बंद करण्यात आला होता. मात्र अगदी थोड्याच वेळात दार उघडलं गेलं. विमानतळावर सर्व सुरक्षेची सोय करण्यात आली आहे. तसेच आपतकालीन स्थिती काचेचा दरवाजा तोडला जाऊ शकतो. प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.

थरारक VIDEO : हजारोंच्या गर्दीत अचानक माजलेला वळू घुसला आणि...

First published: May 28, 2019, 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading