Home /News /entertainment /

'हे सर्व तर.....' South VS Bollywood वादात आता रणवीर सिंहची उडी

'हे सर्व तर.....' South VS Bollywood वादात आता रणवीर सिंहची उडी

Ranveer Singh

Ranveer Singh

अभिनेता किच्चा सुदीपने एक ट्विट करुन खळबळ माजविली होती. त्यांनतर सोशल मीडियावर बॉलिवूड व्हर्सेस साऊथ (Bollywood VS South) असं युद्ध रंगलय.

    मुंबई, 13 मे-   गेल्या काही दिवसांपासून जगभरात साऊथ चित्रपटांची   (South Movies)  चलती आहे. नुकतंच कन्नड अभिनेता यश स्टारर 'KGF Chapter 2' रिलीज झाला होता. जो अजूनही हिंदी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यापूर्वी, एसएस राजामौली दिग्दर्शित राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'RRR' तसेच अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा: द राइज - पार्ट 1' ने देशात चांगली कमाई केली होती. या चित्रपटांबद्दल विशेष बाब म्हणजे मूळ दक्षिण भारतीय भाषेत असूनही, या तीन चित्रपटांनी हिंदी बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं आहे. हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांची पकड पाहिल्यानंतर, अभिनेता किच्चा सुदीपने एक ट्विट करुन खळबळ माजविली होती. त्यांनतर सोशल मीडियावर बॉलिवूड व्हर्सेस साऊथ   (Bollywood VS South) असं युद्ध रंगलय. किच्चा सुदीपने ट्विटमध्ये लिहिलं होतं की, 'हिंदी आता आपली राष्ट्रभाषा नाही. सुदीपच्या ट्विटवर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने त्याच्यावर नाराज होत त्याला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, दोघांमधील ट्विटर वारनंतर दोघांचा संभ्रम दूर झाला आणि दोघांनी एकत्र बोलण्यास सहमती दर्शवली होती. मात्र त्यांनतर बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. सलमान खान, महेश बाबू, मनोज बाजपेयी आणि कंगना रणौत यांच्यानंतर आता या वादात रणवीर सिंहने   (Ranveer Singh)  उडी घेतली आहे. त्याने संपूर्ण देशातील चित्रपटसृष्टीला एक असल्याचं म्हटलं आहे. रणवीरने नुकतंच बॉलिवूड लाईफला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, "मी पुष्पा पाहिला, मला तेलुगू येत नाही. मी आरआरआर पाहिला, मला ती भाषा येत नाही – पण या चित्रपटांनी आणि क्रिएटिव्हिटीने मी पूर्णपणे प्रभावित झालो." रणवीर सिंह पुढे म्हणाला, “मी फक्त इतकंच सांगू शकतो की, या चित्रपटांमध्ये पाहिलेल्या क्राफ्टच्या उत्कृष्टतेची मी प्रशंसा करू शकतो. आणि ते किती चांगलं काम करत आहेत याचा मला फारच अभिमान आहे. त्यांना सर्व प्रकारच्या प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे आणि स्वीकारलं आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो कारण मी इतर ठिकाणी असे चित्रपट पाहिलेले नाहीत."रणवीर सिंह शेवटी म्हणाला, "हे सर्व तर आपलेच आहेत यार. भारतीय सिनेमा एक आहे."
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Ranveer singh, South film

    पुढील बातम्या